पुणे

शेतकऱ्यांना मिळणार दर्जेदार खते

CD

काटेवाडी, ता. १२ : यंदाच्या रब्बी हंगामात ऑक्टोबर २०२५ ते मार्च २०२६ दरम्यान जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २ लाख ६ हजार ६००टन खतांचा पुरवठा होणार आहे. युरिया, डीएपी, एमओपी, एसएसपी आणि एनपीके यांसारख्या खतांचा यात समावेश आहे. ई-पॉस मशिनद्वारे पारदर्शक वितरण सुनिश्चित करण्यात येणार असून, शेतकऱ्यांना वेळेवर आणि दर्जेदार खत मिळेल, अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक संजय काचोळे यांनी दिली.

जिल्हा कृषी विभागाने रब्बी हंगामासाठी सविस्तर नियोजन केले आहे. ऑक्टोबर २०२५ मध्ये २७,३६३ मेट्रिक टन, नोव्हेंबरमध्ये ३३,८३० मेट्रिक टन, डिसेंबरमध्ये ५०,१६२ मेट्रिक टन, जानेवारी २०२६ मध्ये ४१,५९५ मेट्रिक टन, फेब्रुवारीमध्ये २८,५८१ मेट्रिक टन आणि मार्चमध्ये २५,०६९ मेट्रिक टन खतांचे वितरण होईल. युरियासाठी ७४,००० मेट्रिक टन, डीएपीसाठी १५,५०० मेट्रिक टन, एमओपीसाठी ८,१०० मेट्रिक टन, एसएसपीसाठी १५,५०० मेट्रिक टन आणि एनपीकेसाठी ९३,५०० मेट्रिक टन खतांचे नियोजन केले आहे. हे आकडे मेट्रिक टनमध्ये आहेत.

गेल्या रब्बी हंगामात (२०२४-२५) महाराष्ट्रात १० लाख मेट्रिक टनांहून अधिक खतांचे वितरण झाले होते, यात पुण्याचा वाटा १.८ लाख टन होता. मात्र, पुरवठा साखळीतील अडचणी आणि किमतीतील चढ-उतार यामुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागला. यंदा केंद्र सरकारच्या खत अनुदान योजनेंतर्गत (एनबीएस) बजेट १.८४ लाख कोटी रुपये (युरियासाठी १.१९ लाख कोटी आणि पी अँड केसाठी ०.४९ लाख कोटी) वाढल्याने स्थिरता अपेक्षित आहे.

तफावत आढळल्यास विक्रेत्याचा परवाना रद्द
खरीप हंगामामध्ये अनेक वितरकांनी ई-पॉस मशिन वरील खत वितरणाच्या नोंदी गांभीर्याने घेतल्या नव्हत्या. या वितरकांना वेळीच समज देऊन कृषी विभागाने ई-पॉस नोंदी अचूक करण्याचे आदेश दिले होते. ई-पॉसद्वारे प्रत्येक विक्रीची रिअल-टाइम नोंद आयएफएमएस प्रणालीत होईल, ज्यामुळे बनावट खत विक्री रोखली जाईल. पुणे जिल्ह्यात गेल्या महिन्यात ५०० हून अधिक विक्रेत्यांना नवीन मशिन बसवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. साठ्यात तफावत आढळल्यास विक्रेत्याचा परवाना रद्द होईल, अशी माहिती कृषी विभागाने दिली.


खत उपलब्ध (टनमध्ये, ऑक्टोबर ते मार्च २०२५ पर्यंत)
महिना.....युरिया......डीएपी....एमओपी.....एसएसपी...एनपीके
ऑक्टोबर...८,८८०.....२,१७०......१,०५३....२,१७०....१३,०९०
नोव्हेंबर....१०,३६०...३,४१०.....१,२१५......२,०१५....१६,८३०
डिसेंबर.....१८,५००....३,८७५.....१,७८२.....३,५६५....२२,४४०
जानेवारी....१५,५४०....२,४८०.....१,६२०......३,२५५....१८,७००
फेब्रुवारी.....११,१००.....१,७०५.....१,२९६.....२,३२५....१२,१५५
मार्च.......९,६२०......१,८६०.....१,१३४....२,१७०....१०,२८५
एकूण.....७४,०००......१५,५००.....८,१००....१५,५००....९३,५००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Disha Patani house firing अभिनेत्री दिशा पटानीच्या घरावर गोळीबार; ‘या’ गँगस्टरने घेतली हल्ल्याची जबाबदारी!

Phulambri Accident : कार-दुचाकीचा अपघात मुलाच्या डोळ्यासमोर बापाने सोडला जीव..! मुलगा थोडक्यात बचावला

Latest Marathi News Updates Live : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

PAK vs OMN : पाकिस्तानच्या दुबळ्या ओमानविरुद्ध रडले, फलंदाजांनी माना टाकल्या; भारताविरुद्ध निघणार यांची हवा...

Chhagan Bhujbal: ''मराठ्यांना EWS अन् SEBC आरक्षण नकोय का? उत्तर द्या'' छगन भुजबळांचा समाजाला प्रश्न

SCROLL FOR NEXT