काटेवाडी, ता. १५ : थंडीचा कडाका वाढल्याने जळोची उपबाजारात भाजीपाल्याचे बाजारभाव तेजीत आले आहेत. जळोची उपबाजारात शनिवारी (ता. १५) एकूण ११८१.४० क्विंटल फळभाज्यांची आवक झाली.
बाजारात पालेभाज्यांची ११६०० पेंडी भर आवक नोंदवली गेली. गावरान गवारला प्रतिक्विंटल १५ हजार, वांगी प्रतिक्विंटल ७ हजार, शेवगा १२ हजार, गोल्डन वाटणा१५ हजार रुपये प्रतिक्विंटल इतका उच्चांकी दर मिळाला. तर कोथिंबिरीला शेकडा २ हजार रुपये बाजारभाव मिळाला.
बारामतीच्या जळोची उपबाजारामध्ये कोथिंबीर, मेथी, पालक, कांदापात, शापूसह पालेभाज्यांची मोठी आवक झाली होती. बटाट्याची ५४० क्विंटल आवक सर्वाधिक, तर लसूण १०० क्विंटल आवक होती. लिलाव बाजारामध्ये वांगी (किमान २५००, कमाल ७०००) आणि टोमॅटो (किमान १०००, कमाल २५००) या दोन फळभाज्यांचे दर वाढलेले आढळले.