पुणे

जिल्ह्यात उन्हाळी भुईमूग फुलणार

CD

काटेवाडी, ता. १४ : राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया (एनएमईओ-ओएस) अंतर्गत उन्हाळी हंगामसाठी जिल्ह्यासाठी भुईमूग बियाणांवर शंभर टक्के अनुदान देण्यात येणार आहे. राज्यातील निवडक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार असून, इच्छुकांनी महाडीबीटी पोर्टलवर लवकरात लवकर अर्ज करावेत, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

अभियानाचा उद्देश देशांतर्गत तेलबियांचे उत्पादन वाढवणे आणि खाद्यतेलाची आयात कमी करणे हा आहे. यासाठी उन्हाळी भुईमूग आणि तीळ पिकांच्या सुधारित वाणांचा प्रसार केला जाणार आहे. अधिक माहितीसाठी इच्छुक शेतकऱ्यांनी जवळच्या तालुका कृषी अधिकारी किंवा उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

प्रतिशेतकरी किमान ०.२० हेक्टर ते कमाल १ हेक्टर क्षेत्रासाठी लाभ मिळेल. बियाणे शासकीय पुरवठादारांकडून पॅकिंगनुसार (भुईमूग - २० किंवा ३० किलो, तीळ - ५०० ग्रॅम किंवा १ किलो) दिले जाईल. क्षेत्रापेक्षा पॅकिंगमुळे जादा बियाणे आल्यास त्याची रक्कम शेतकऱ्यांना स्वतः भरावी लागेल.

भुईमूग........... हेक्टरी १५० किलो (दर ११४ रुपये/किलो)
तीळ........... हेक्टरी २.५ किलो (दर १९७ रुपये/किलो)

असा करा अर्ज
- अर्ज फक्त https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर करावा.
- ‘प्रमाणित बियाणे वितरण, प्रात्याक्षिके, फ्लेक्झि घटक औषधे आणि खते’ उपलब्ध
- शेतकऱ्यांची Agristack वर नोंदणी असणे अनिवार्य आहे. लाभार्थी
- निवड प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (FCFS) तत्त्वावर होईल.


तेलबियांच्या लागवडीमध्ये जास्तीत जास्त सुधारणा व्हाव्यात यासाठी शासनामार्फत हे बियाणे उपलब्ध करून देण्यात येत आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावेत.
- दीपक गरगडे, तालुका कृषी अधिकारी इंदापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी दुर्घटना टळली! पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड

पुण्यात भाजपचा महापौर ठरला! अजितदादांनी दिलेला शब्द NCPने पाळला, फडणवीसांसोबत झाली होती चर्चा

Nagpur News: टीईटीने केली तीन हजारांवर शिक्षकांची कोंडी! अनुकंपाधारकांना पाच वर्षांची अट; अन्यथा सेवा प्रथम नियुक्तीपासून धरणार!

Pune Crime : दुर्दैवी अंत! ४ महिन्यांच्या मुलीसह मायलेकांनी विहिरीत उडी घेऊन संपवलं जीवन; पाबळमधील हृदयद्रावक घटना

Latest Marathi News Live Update : पुणे महापालिकेच्या महापौरपदासाठी मंजूषा नागपुरे यांचे नाव निश्चित

SCROLL FOR NEXT