पुणे

काटेवाडीत अजितदादांच्या अस्थीकलशाचे दर्शन

CD

काटेवाडी, ता. ४ : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्यभरात शोककळा पसरली आहे. काटेवाडी (ता बारामती) या त्यांच्या मूळ गावी बुधवारी (ता. ४) अस्थी कलश दर्शनासाठी ठेवले होते. यावेळी कार्यकर्ते, गामस्थांनी अस्थीकलशाचे दर्शन घेत आपल्या दिवंगत नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
अजित पवार यांचे २८ जानेवारी २०२६ रोजी बारामतीजवळील विमान अपघातात दुःखद निधन झाले होते. या अपघातात त्यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर २९ जानेवारीला बारामतीतील विद्या प्रतिष्ठान मैदानावर शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले. अस्थींचे संकलन करून मंगल कलशांमध्ये विभागण्यात आले असून, त्यापैकी एक कलश काटेवाडी येथील पालखी ओटा परिसरात ठेवण्यात आला होता. अस्थी कलशासमोर फुलांच्या पाकळ्या, वाहून ग्रामस्थांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी काही कार्यकर्त्यांनी अश्रू अनावर झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, स्थानिक नेते आणि ग्रामस्थांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी अजित पवार यांच्या विकासकामांचे स्मरण करून त्यांच्या विचारांचे पालन करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

01603

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

औद्योगिक क्षेत्रात कोणतीही गुंडगिरी किंवा बेकायदेशीर खंडणी खपवून घेतली जाणार नाही, देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट निर्देश

U19 World Cup: 'अजून खूप दूर जायचंय...' वैभव सूर्यवंशीची विश्वविजेता झाल्यानंतरची पोस्ट चर्चेत

Gangapur Accident News : शिवपूर शिवारात भीषण अपघात, भरधाव कंटेनर-आयशरची समोरासमोर धडक; दोन्ही चालकांचा जागीच मृत्यू

Ahilyanagar News: अहिल्यानगरमध्ये CTET परीक्षा केंद्रावर महिलांना मंगळसूत्र काढण्यास सांगितले; देवेंद्र फडणवीसांकडून चौकशीचे आदेश

Chandrapur : भाजपकडून ठाकरेसेनेला महापौरसहित पदांची ऑफर, आधी कुणाचा महापौर? प्रश्नावर चर्चा थंडावली

SCROLL FOR NEXT