पुणे

कुजलेल्या जलपर्णीमुळे आरोग्य धोक्यात

CD

खुटबाव, ता. १६ : दौंड तालुक्यातील नदीकाठच्या गावामध्ये मुळा मुठा व भीमा नदीवरील जलपर्णी कुजली आहे. यामुळे तयार झालेल्या डासांच्या उपद्रवामुळे देलवडी तसेच इतर गावांतील ग्रामस्थ, जनावरांचा आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.

गेली १५ वर्षांपासून दरवर्षी पावसाळ्यानंतर हळूहळू या नदीपात्रामध्ये जलपर्णी जमण्यास सुरुवात होते. पुण्यातील सांडपाणी मुळा-मुठा नदीमध्ये सोडले जाते. या नद्यांवर दर पाच किलोमीटरवर कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. त्यांच्यावर पावसाळ्यानंतर झडपा टाकल्या जातात. त्यामुळे जलपर्णीचे मुळा मुठा नदीपात्रावर अक्षरशः आवरण तयार झाले आहे. उन्हाळा सुरू होताच कडक उन्हामुळे जलपर्णी कुजते. या जलपर्णीपासून पांढऱ्या रंगाचे डास तयार होतात. दिवसा शांत असणारे हे डास रात्रीच्या सुमारास मानवी शरीर व गुरे यांच्यावर तुटून पडत असल्याचा अनुभव नदीकाठचे ग्रामस्थ घेत आहेत.

ऐन उन्हाळ्यात ग्रामस्थांची अक्षरश: झोप उडाल्याची तक्रार नदीकाठच्या ग्रामस्थांनी केली. याशिवाय गुरे डासांमुळे शांतपणे बसून विश्रांती घेऊ शकत नाही.
वाळकी येथील एका शेतकऱ्याने गुरांचे डासांपासून संरक्षणासाठी गोठ्याभोवती मच्छरदाणी बांधली आहे. राहू, देलवडी, पिंपळगाव, पारगाव, नानगाव, वाळकी हातवळण, वडगाव रासाई, नागरगाव या गावातील ग्रामस्थ या डासांमुळे अक्षरश: हैराण झाले आहेत

जागरण गोंधळ, लोकनाट्यांच्या कार्यक्रमावर परिणाम
गावामध्ये रात्रीच्या वेळी असणारे सप्ताह,जागरण गोंधळ,लोकनाट्य तमाशा या कार्यक्रमाला रात्रीची डासांमुळे गर्दी वरती परिणाम होत आहे. डासांवर उपाययोजना करण्यासाठी जलपर्णी कायमस्वरूपी नष्ट करावी, अशी मागणी देलवडीचे ग्रामस्थ सुभाष गायकवाड यांनी केली आहे.


शासन जलपर्णीबाबत गंभीर
दौंडचे आमदार राहुल कुल हे प्रत्येक विधानसभा अधिवेशनात जलपर्णी काढण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी करत असतात. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वरंवड येथील प्रचार सभेत मुळा मुठा व भीमा नदीतील जलपर्णी या विषयावर राज्य शासन गंभीर असल्याचे सुतोवाच केले. यावरून शासन जलपर्णी या विषयावर गंभीर असल्याचे दिसून येते.
01032

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Woman: रशियन महिला सापडली ते गोकर्णचं घनदाट जंगल... माणूस हरवला की रस्ता ही सापडणार नाही, फोटो पाहा

रशियन महिलेच्या मुलींचे वडील कोण? भारतात का आली होती? मोठे अपडेट समोर

Shravan 2025 Food Avoid: श्रावणात नॉन व्हेज टाळताय? मग प्रथिनांची कमतरता भरून काढण्यासाठी 'या' 5 शाकाहारी पदार्थांचा करा आहारात समावेश

Latest Maharashtra News Updates : आळंदीत रविवारी संत भेटीचा सोहळा, वारकरी संप्रदायाला अनुभवायला मिळणार दुग्धशर्करा योग

Local Elections 2025 : नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप, इच्छुकांचा अभ्यास, जिल्हा परिषद गट-गण प्रारूप रचना; निवडणूक मोर्चेबांधणीला सुरुवात

SCROLL FOR NEXT