खुटबाव, ता. ९ : गलांडवाडी (ता. दौंड) येथील ग्रामस्थांच्या योगदानातून २६ चिमुकल्यांना नव्या सायकलीचे वितरण करण्यात आले. यामुळे शाळेमध्ये चिमुकल्यांची व सावित्रीच्या लेकींची दररोज होणारी पायपीट आता कायमस्वरूपी मिटणार आहे.
पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी ‘सायकल बँक उपक्रम’ राबविला आहे. या उपक्रमाला उदंड प्रतिसाद देत २६ नव्या सायकली गोळा केल्या. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी गजानन पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना नव्या कोऱ्या सायकली वितरित करण्यात आल्या. यावेळी चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद व समाधानाचे भाव होते. विविध प्रकल्पासंदर्भात पाटील यांनी येथील प्राथमिक शाळेस भेट दिली. शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी शाळेसाठी २० गुंठे जागा देणारे निळकंठ शितोळे व १ लाख रुपये देणगी देणाऱ्या किशोर छाजेड यांचा सन्मान केला. मुख्यमंत्री समृद्ध ग्राम स्पर्धेमध्ये गावाने सहभाग घेण्यासाठी ग्रामस्थांना प्रोत्साहित केले. गावातील नियोजित प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचे बांधकाम व ग्रामपंचायत कार्यालयाची पाहणी केली.
यावेळी गटविकास अधिकारी अरुण मरभळ, गटशिक्षणाधिकारी संजय महाजन, आरोग्य अधिकारी उज्ज्वला जाधव, गलांडवाडीचे सरपंच रमेश पासलकर, तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने व शिक्षक वर्ग उपस्थित होते.
यावेळी शिक्षणतज्ञ संदीप शितोळे म्हणाले की, ‘‘सायकल बँक हा उपक्रम ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांसाठी सायकल उपलब्ध करून देणे हा आहे. ज्यामध्ये या सर्व सायकली विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर परत शाळेकडे जमा होतील. त्यानंतर नवीन विद्यार्थ्यांना या सायकली शैक्षणिक प्रवासासाठी दिल्या जातील.’’
गलांडवाडी गावचा विकास पाहून समाधान वाटले. ग्रामस्थांच्या योगदानातून ग्रामसचिवालय, आदर्श शाळा, वृक्षारोपण या विषयावर चांगले काम झाले आहे. शाळेची गुणवत्ता चांगली आहे. बंद पडण्याच्या मार्गावर असणाऱ्या प्राथमिक शाळेसाठी शिक्षक व ग्रामस्थ यांचे समर्पण व उत्तरदायित्व यामुळे पटसंख्या वाढली आहे.
- गजानन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी
02873
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.