पुणे

पारगाव येथील शाळेत चिमुकल्यांनी साकारली परसबाग

CD

खुटबाव, ता. १८ : पारगाव (ता. दौंड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी दोन गुंठे क्षेत्रामध्ये सेंद्रिय परसबाग तयार केली आहे. ही बाग आता बहरली असून पालक व ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेत आहे. या बागेमध्ये टोमॅटो, पालक, कोथंबीर, वांगी, भोपळा, मिरची, औषधी वनस्पती अशा विविध प्रकारच्या तरकारी पिकांचे उत्पादन घेतले जाते. ही तरकारी शालेय पोषण आहाराच्या भाज्यांसाठी वापरली जाते.
शाळेच्या पाठीमागील बाजूस असणाऱ्या मोकळ्या जागेत शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य विशाल ताकवणे यांच्या संकल्पनेतून ही परसबाग साकारण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने तरकारी पिकांची लागवड केली. शाळेच्या मुख्याध्यापिका चंद्रकला काटे, भरत शिंदे, संतोष कांबळे, आनंद नागवडे, शहाजी गिरे, संगीता शिंदे, छगन खळदकर, आशा देशमुख, अनिता खेडकर, दीक्षा घोंगडे आदी शिक्षकांचे या उपक्रमावर विशेष लक्ष असते. या बागेमुळे विद्यार्थ्यांना शेती आणि सेंद्रिय पिकांबद्दल लहान वयातच माहिती मिळत आहे.
पारगाव येथील ही जिल्हा परिषद केंद्र शाळा दौंड तालुक्यातील पहिली ते चौथीपर्यंत सर्वाधिक ३१५ इतकी पटसंख्या असणारी एकमेव शाळा आहे. पारगाव व परिसरातील पालक आपल्या पाल्याचा प्रवेश या शाळेत घेण्यासाठी आग्रही असतात. अनेक सधन पालकांनी आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत न पाठवता या शाळेत प्रवेश घेऊन दिला आहे.

लोकसहभाग हे पारगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या यशाचे गमक आहे. प्रत्येक शनिवारी लोकसहभागातून शालेय विद्यार्थ्यांसाठी गोड पदार्थ बनवला जातो. आगामी वर्षभरात शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीवर काम करणार आहे.
- चंद्रकला काटे, मुख्याध्यापिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parbhani News : अतिवृष्टीग्रस्त परभणी जिल्ह्यासाठी १२८ कोटींची आर्थिक मदत मंजूर; शेतकऱ्यांना थेट खात्यात जमा होणार नुकसानभरपाई

Pune Heavy Rain: पुण्यात मुसळधार पाऊस! रस्त्यांना नद्यांचं स्वरुप, वाहतूक ठप्प; पुणेकर खोळंबले

Latest Maharashtra News Updates : अक्कलकोट तालुक्यात ओला दुष्काळाची स्थिती – जयकुमार गोरे

Parner Crime : सातबारा उताऱ्यावर नोंद लावण्यासाठी आठ हजारांची लाच घेताना कामगार तलाठ्याला रंगेहाथ पकडले

Pune Heavy Rain : पाषाण परिसरात मेघगर्जनेसह पावसाची हजेरी; चाकरमान्यांचे हाल, सखल भागात पाणी साचले

SCROLL FOR NEXT