पुणे

नानगाव येथे उमाजी नाईक यांचे स्मारक उभारणार

CD

खुटबाव, ता.२४ : नानगाव ( ता.दौंड) येथे आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे शासन व लोकसहभागातून दौंड तालुक्यातील पहिले स्मारक उभारणार, असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष संदीप पाटील खळदकर यांनी केले.
नानगाव येथील मुख्य चौकामध्ये आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची २३४वी जयंती साजरी करण्यात आली याप्रसंगी ते बोलत होते. या वेळी खळदकर म्हणाले की, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शेजारील दोन गुंठे जागेमध्ये स्मारक उभारण्यात येणार आहे. यासाठी दौंडचे आमदार राहुल कुल व जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष दौलत शितोळे यांच्याकडे पाठपुरावा करणार आहोत. शासनाचा निधी, लोकवर्गणीतून उमाजी नाइकांचा पुतळा व परिसर सुशोभीकरण करण्यात येणार आहे. या वेळी उमाजी नाईक यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाला राष्ट्रवादी प्रदेश युवक चिटणीस विकास पाटील खळदकर, उपसरपंच विष्णू खराडे, रयत क्रांती संघटनेचे राज्याचे कार्याध्यक्ष बापूसाहेब खोमणे , नवनाथ मंडले, दादा खोमणे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला राहुल वळू, गोरख जाधव, दत्तात्रेय खोमणे, सुनील खोमणे, सुनील आढागळे, सचिन शेलार तसेच जय मल्हार तरुण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमापूर्वी जेजुरी ते नानगाव ज्योत आणण्यात आली. सागर चव्हाण यांचे उमाजी नाईक यांच्या जीवन चरित्रावर व्याख्यान झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : सोन्याच्या भावात किंचित घसरण तर चांदीचे भाव स्थिर; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे भाव

Asian Youth Wrestling Gold: पालातून फुटली ‘सुवर्ण’भविष्याला पालवी! माळरानावर कुस्तीचा सराव करणाऱ्या सनीची बहरीनमधील स्पर्धेत चमक

Patna Accident News : धक्कादायक ! घराचे छत कोसळून ५ जण ठार, अवघ्या काही सेकंदांत अख्खं कुटुंबच संपलं

Pune University : SPPU अधिष्ठाता भरती रद्द! 'या' कारणामुळे विद्यापीठाची संपूर्ण प्रक्रिया पुन्हा नव्याने राबवणार; नियुक्त्या आणखी लांबणार

डॉक्टरच्या खोलीत ३०० किलो RDX, दोन एके ४७ अन्...; देशात घातपाताचा मोठा कट उधळला

SCROLL FOR NEXT