खुटबाव, ता. २७ : आगामी महिनाभरात सुरू होणाऱ्या गळीत हंगामामध्ये दौंड तालुक्यामध्ये दोन नवीन ऊस उद्योग उतरत असल्याने ऊस मिळवण्यासाठी साखर कारखान्यांमध्ये स्पर्धा रंगणार आहे. या उद्योगांमध्ये यवत येथील बंद असलेला अनुराज शुगर्स कारखाना व मिरवडी येथील खासगी गूळ उद्योग यांचा समावेश आहे. यापूर्वी १२० ते १३० दिवसांचा असणारा गाळप हंगाम आता १०० दिवसांचा राहील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे ऊस मिळवण्यासाठी कारखान्यांमध्ये स्पर्धा लागणार आहे.
दौंड तालुका जिल्ह्यातील अग्रगण्य ऊस उत्पादक तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यामध्ये दरवर्षी ५० लाख टन ऊस उत्पादन घेतले जाते. मुळा मुठा नदी व भीमा नदीच्या सुपीक खोऱ्यामध्ये तसेच खडकवासला कालव्यातून येणाऱ्या पाण्यामुळे तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ऊस शेती केली जाते.एकेकाळी भीमा पाटस कारखाना हा तालुक्यातील अनेक ऊस उत्पादकांची जीवन वाहिनी होती. त्यानंतर दौंड शुगर व श्रीनाथ म्हस्कोबा कारखाने स्पर्धेमध्ये आले.
दृष्टिक्षेपात
१. यवत येथील अनुराज शुगर कारखाना गेली काही दिवस व्यवस्थापनाच्या अडचणीमुळे बंद होता.
२. ओंकार शुगर ग्रुपने अनुराज कारखाना चालवायला घेतला आहे, त्यामुळे या धुराडे यंदा पेटवण्यासाठी व्यवस्थापन प्रयत्नशील
३. चालू वर्षी मिरवडी येथे दररोज १२५० टन ऊस गाळप करणारे कुंजीर बायोटेक जागरी युनिट सुरू
मागील हंगामात प्रतिटनास उसाला मिळालेला बाजारभाव
भीमा पाटस ..............३०००
दौंड शुगर..............२८७५
श्रीनाथ म्हस्कोबा कारखाना..............३०००
गाळप हंगाम होणार आटोपशीर
यापैकी दिवाळी दरम्यान दौंड शुगर अंतिम हप्ता वाढवण्याची शक्यता आहे. मिरवडी येथील खासगी गूळ उद्योग समूहाने ३००० रुपये प्रति टनाने ऊस खरेदी सुरू केली आहे.याशिवाय दौंड तालुक्यातील वर्षभर चालणारी ४०० परप्रांतीय गुऱ्हाळघरे मोठ्या प्रमाणावर ऊस गाळप करत आहेत. त्यामुळे यावर्षीचा गाळप हंगाम हा कमी वेळेचा व आटोपशीर होईल असे चित्र आहे.
३८७५० टन...... दौंड तालुक्यातील दररोज होणार ऊस गाळप
या कारखान्यांनी वाढविली दैनंदिन गाळप क्षमता (टनांत)
दौंड शुगर..............१७५००
भीमा पाटस..............७५००
श्रीनाथ म्हस्कोबा..............५०००
अनुराग शुगर्स..............२५००
कुंजीर बायो जागरी युनिट..............१२५०
खासगी गुऱ्हाळे..............५०००
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.