खुटबाव, ता. ११ : पारगाव (ता. दौंड) येथे एकल महिलांसाठी कॅन्सरविषयक आरोग्य तपासणी शिबिर झाले. या एकल महिला शिबिरामध्ये एकूण ४७० महिलांची तपासणी करण्यात आली. यामध्ये सर्वच्या सर्व महिलांची हिमोग्लोबिन तपासणी, १८८ महिलांची नेत्रतपासणी, ५३ महिलांची ईसीजी तपासणी, ४७० महिलांची एनसीडी तपासणी, ७२ महिलांना गोल्डन कार्ड आणि २२ महिलांची गर्भाशय तपासणी करण्यात आली.
शिबिराचे आयोजन प्राथमिक आरोग्य केंद्र, नानगाव यांच्या वतीने केले होते. शिबिराचे उद्घाटन सरपंच सुभाष बोत्रे यांच्या हस्ते झाले. या वेळी ग्रामपंचायत विस्तार अधिकारी संजय शिंदे, ग्रामविकास अधिकारी मुरलीधर बडे, डॉ. भरत खळदकर आदी उपस्थित होते. सर्व तपासण्या नानगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रणजित भंडलकर, डॉ. अनिकेत उघडे पाटील यांनी केल्या.
शिबिरात विविध तज्ज्ञ डॉक्टरांनी महिलांची मोफत तपासणी करून आरोग्य सल्ला दिला. यामध्ये कॅन्सरतज्ज्ञ डॉ. विशाल खळदकर, डॉ. उत्कर्ष रूपनवर, डॉ. स्नेहा रणदिवे, डॉ. स्नेहा तांबे, चैताली राऊत तसेच डॉ. बी. बी. खळदकर नर्सिंग कॉलेज प्राध्यापकांचा सहभाग उल्लेखनीय होता.
पुणे जिल्हा परिषदेने सर्व्हिकल कॅन्सर मुक्त पुणे जिल्हा हा उपक्रम हाती घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून पारगाव येथे महिलांची आरोग्य तपासणी केली. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागामध्ये दिवसेंदिवस कॅन्सरचा आजार वाढतोय. त्या दृष्टीने प्रतिबंध म्हणून आजचा उपक्रम घेण्यात आला. पारगावमधील महिलांनी या उपक्रमासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
- डॉ. विशाल खळदकर, कॅन्सर तज्ज्ञ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.