पुणे

भांडगावची ‘सौर ऊर्जचे गाव’कडे वाटचाल

CD

खुटबाव, ता. १३ : भांडगाव (ता. दौंड) येथील कर्तव्य फाउंडेशनच्या वतीने गावातील ३७ कुटुंबाना मोफत सूर्यघर योजनेचे वाटप व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मच्छिंद्रनाथ चिंचोळी (ता. घनसावंगी, जि. जालना) येथील शाळेचे पाच वर्ग डिजिटल वर्गात रूपांतर हे सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. यापूर्वी भांडगावमध्ये एक वर्षांपूर्वी सूर्यघर उपक्रमामध्ये ७८ कुटुंबांसाठी योजना राबविण्यात आली होती. आता दोन टप्प्यात ११५ कुटुंबांना मोफत सौरघर ऊर्जेचा लाभ मिळणार आहे. यामुळे भांडगाव सौरग्राम बनण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे गेले आहे.
कर्तव्य फाउंडेशनच्या वतीने माझा ध्यास-माझे भांडगाव-सौर ऊर्जेचे गाव (टप्पा २)अंतर्गत मोफत सूर्यघर योजनेमधून शून्य खर्चात ३७ कुटुंबांसाठी सौर ऊर्जा प्रकल्प जानेवारी महिन्यात कार्यान्वित झाला.
तसेच प्रत्येक कुटुंबाने जमा केलेली ३३,००० रुपये सबसिडी स्वरूपात प्रत्येकी ३३,०००‌ रुपये प्रमाणे ३७ पैकी २७ कुटुंबांच्या खात्यावर आत्तापर्यंत जमा झाले आहेत. भांडगावला सौरग्राम बनविण्यासाठी या प्रकल्पाची अंमलबजावणी स्वयंउर्जा रिनेव्हबल या कंपनीमार्फत करण्यात आली. या उपक्रमासाठी वेस्टर्न मटेरियल प्रायव्हेट कंपनी भांडगाव या कंपनीचा सीएसआर फंड वापरण्यात आला. तसेच सांगली जिल्ह्यातील मच्छिंद्रनाथ सांगवी येथील प्रकल्पामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना आधुनिक डिजिटल शिक्षणाची सुविधा उपलब्ध होणार असून शिक्षण प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर होणार आहे. तसेच शिक्षकांना अध्यापन अधिक सुलभ, परिणामकारक व अद्ययावत पद्धतीने करता येणार आहे. हिंदुस्थान प्लॅटिनम प्रायव्हेट लिमिटेड, नवी मुंबई या कंपनीचा पाच लाख रुपये सीएसआर फंड वापरण्यात आला. यासंदर्भात ग्रामस्थ संतोष दोरगे म्हणाले की, या उपक्रमामुळे भांडगावमधील ११५ कुटुंबांची आगामी २५ वर्षामध्ये प्रत्येकी दरमहा ८०० ते ९०० रुपये लाइट बिल बचत होणार आहे. हा उपक्रम दौंड तालुक्यामध्ये सर्वप्रथम भांडगावमध्ये राबवल्याबद्दल कर्तव्य फाउंडेशनचे आभार व्यक्त करतो.


फाउंडेशनच्या वतीने वेगवेगळे उपक्रम राबवण्यावर भर आहे. आगामी २०२६ या वर्षात कर्तव्य फाउंडेशन सौर ऊर्जा अभियान, शैक्षणिक गुणवत्ता विकास व महिला बचत गट या क्षेत्रात नवीन उपक्रम राबवणार आहे.
-श्याम कापरे, संस्थापक अध्यक्ष, कर्तव्य फाउंडेशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Leopard Poisoning Case : मादी बिबट्याचा संशयास्पद मृत्यू, विष घालून मारल्याचा प्राथमिक अंदाज

Janhavi Kandula Case : न्याय मिळाला! अमेरिकेत पोलीस वाहनाच्या धडकेत मृत्यू झालेल्या जान्हवीच्या कुटुंबाला 260 कोटींची मोठी नुकसानभरपाई

Latest Marathi News Live Update : पंकजा मुंडे – धनंजय मुंडे एकाच मंचावर; बीड मध्ये रंगला दिलखुलास संवाद

IND vs PAK : आर अश्विनची 'स्मार्ट' आयडिया! फेकाड्या उस्मान तारिकला 'डिवचण्या'चा फंडा सांगितला! म्हणाला, भारताने तर.. Video

Sakal Property Expo : पुण्यात घर घ्यायची सुवर्णसंधी ‘सकाळ प्रॉपर्टी महायात्रा’ उद्यापासून; गुंतवणुकीचे पर्याय एकाच छताखाली

SCROLL FOR NEXT