पुणे

लोकशाही दिन केवळ वरकुटे येथे नावापुरताच

CD

लोणी देवकर ता. २२ ः सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी आणि अडचणी तत्परतेने आणि न्यायमार्गाने शासकीय यंत्रणेमार्फत सोडवण्यासाठी शासनाकडून एक प्रभावशाली उपाययोजना म्हणून लोकशाही दिन साजरा केला जातो. परंतु सोमवारी (ता. १६) वरकुटे पाटी (ता. इंदापूर) येथे आयोजित लोकशाही दिन कार्यक्रम फक्त नावापुरताच साजरा झाली की काय अशी परिस्थिती पाहायला मिळाली. प्रशासकीय यंत्रणा आणि नागरिकांमधील समन्वयाच्या अभावामुळे या कार्यक्रमांमध्ये नागरिक उपस्थित देखील राहू शकले नाहीत.
‘सकाळ’च्या प्रतिनिधीशी बोलताना, लोकशाही दिनाची माहिती परिसरातील नागरिकांना शासकीय यंत्रणा मार्फत योग्यरीत्या पोचलीच नसल्याची काही नागरिकांनी तक्रार केली. तर कार्यक्रमाच्या स्थळी सर्व प्रशासकीय विभाग प्रमुख किंवा त्यांचे प्रतिनिधी हजर नव्हते. त्यामुळे काही उपस्थित नागरिकांची कामे होण्यास अडचणी निर्माण झाल्या. प्रशासकीय यंत्रणेची उदासीनता आणि प्रभावीपणे लोकांपर्यंत कार्यक्रमाची माहिती न पोहोचल्यामुळे नागरिकांचा प्रतिसादही अत्यल्प होता. त्यामुळे वरकुटे पाटी येथील झालेला लोकशाही दिनाचा कार्यक्रम हा फक्त नावापुरताच पार पडल्याचे नागरिकांनी सांगितले.
लोकशाही दिनानिमित्त प्रशासनाच्या सर्व विभागांनी एका छताखाली उपस्थित राहत नागरिकांच्या समस्या न्याय मार्गाने सोडवणे अपेक्षित आहे. परंतु सोमवारी झालेल्या लोकशाही दिनी अनेक विभाग प्रमुख किंवा त्यांचे प्रतिनिधी गैरहजर असल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली. याबाबत संबंधित अधिकाऱ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Godavari River Flood : गोदामाय कोपली! गेवराईतील ३२ गावातील दोन हजारांहून अधिक कुटूंबियाचे स्थलांतर

SSC HSC Exam Form : दहावी-बारावीच्या खासगी विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणीसाठी १५ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

Viral Video : पतीसोबत गरबा खेळताना अचानक कोसळली महिला अन्... हृदयद्रावक व्हिडिओ

Pune News : ११६ कोटीची जमीन नाममात्र दरात हस्तांतरित करा; अजित पवारांच्या जिल्हा प्रशासनाला सूचना

Phulambri News : फुलंब्रीत तिहेरी मृत्यूच्या घटना! विद्युत शॉक, गळफास व विषारी औषधाने तिघांचा बळी

SCROLL FOR NEXT