पुणे

‘आनंददायी शनिवार’ उपक्रमाकडे शाळांची पाठ

CD

लोणी देवकर, ता. १३ : राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये मागील शैक्षणिक वर्षापासून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक शनिवारी ‘आनंददायी शनिवार’ हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला होता. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जावा, हा यामागचा दृष्टिकोन आहे.
उपक्रमाप्रमाणे शाळांच्या वेळापत्रकात बदल केले होते. त्यामुळे शनिवार हा आनंददायी ठरणार असे दिसत होते. परंतु, या वर्षीच्या शैक्षणिक वर्षात हा उपक्रम कुठेतरी बाजूला पडल्याचे चित्र इंदापूर तालुक्यातील बहुतांश शाळांमध्ये दिसत आहे. काही शाळेच्या वेळापत्रकात नावापुरता तर काही शाळांच्या वेळापत्रकामधून उपक्रम हद्दपार झाल्याच धक्कादायक सत्य समोर येत आहे. व्यस्त जीवनशैलींमधून विद्यार्थ्यांवर येत असलेला शैक्षणिक ताण व त्यातून होत असलेली चिडचिडपणाची समस्या पुन्हा भेडसावण्याची भीती यामुळे निर्माण होताना दिसत आहे. हा उपक्रम बंद करून विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याशी शाळा खेळत असल्याचा आरोप काही अभ्यासक व पालक करत आहे. अभ्यासकांच्या व राज्य शासनाच्या उदात्त धोरणामध्ये असणाऱ्या या अभियानास शाळा आणि शिक्षकांकडून दिला जाणारा फाटा यावर वेळीच आवर आणत पुन्हा एकदा विद्यार्थी हितासाठी ही संकल्पना सक्षमपणे राबवावी, अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alandi News : आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीवर राज्यातील पहिली 'महिला तक्रार निवारण समिती' स्थापन

2 October Numerology 2025: 'या' मूलांकाच्या लोकांना पैसा मिळणार, प्रेमही फुलणार...; वाचा १ ते ९ अंकांसाठी दिवस कसा असेल?

Pawanraje Sonawane : एसटीच्या आरक्षणावर डाका टाकू देणार नाही; कन्नडमध्ये 'आदिवासींचा हुंकार, जनआक्रोश, आरक्षण बचाव मोर्चा'

Latest Marathi News Live Update: पोलीस पडताळणीत अहिल्यानगर पोलिसांची निलेश घायवळला क्लिनचिट

Pro Kabaddi 12: नो हँडशेक ड्रामा! हरियाना स्टीलर्सने हास्तांदोलन टाळण्यावेळी काय झालं होतं? दबंग दिल्लीचा कर्णधार म्हणतोय...

SCROLL FOR NEXT