लोणी देवकर, ता. २५ ः इंदापूर शहरांमध्ये काही दिवसांपूर्वी भटक्या कुत्र्यांनी १४ ते १५ लोकांचा चावा घेतल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर ग्रामीण भागात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ग्रामीण भागामध्ये या भटक्या कुत्र्यांचा ग्रामस्थांसह प्रवाशांना व विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत असल्याने काही ठोस उपाययोजना राबवणे आवश्यक असल्याची गरज ग्रामीण भागात प्रकर्षाने जाणवत आहे.
तालुक्यात भटक्या कुत्र्याची प्रचंड वाढ झाली असून, गावोगाव हे कुत्रे झुंडीने फिरतात. मोकळे मैदाने, रस्ते, चौक, शाळेची मैदाने ही या कुत्र्यांचे मुख्य अड्डे बनले आहे. गावोगाव १५ ते २० संख्येने ही मोकाट कुत्री फिरत असतात. या कुत्र्यांचा दिवसेंदिवस उपद्रव वाढत असून, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. गावाकडे कुत्र्यांच्या चाव्यामुळे आणि झुंड करून फिरत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. मोकाट कुत्र्यांकडून पाळीव कुत्री, कोंबड्या, शेळ्या, बकरी यांच्या शिकारी केल्या जातात. या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून, रस्त्यावरून चाललेल्या गाडीचा पाठलाग करणे, रात्री घराकडे जाताना लोकांना त्रास देणे, विद्यार्थ्यांचा पाठलाग करून चावा घेणे, अशा घटना वारंवार घडत असतात. अशात कधी- कधी भटके कुत्रे अचानक वाहनांवर हल्ला करतात. अनेकवेळा कुत्र्यांच्या हल्ल्याच्या भीतीने वाहनचालक रस्त्यावर पडतात आणि गंभीर जखमी होतात.
या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करणे आवश्यक असून, यासाठी उपाययोजनांची आवश्यकता आहे. प्रशासनाने कुत्र्यांचे निर्बीजीकरण मोहीम, पुनर्वसन, सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता आदी महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कुत्र्यांचा अधिवास वेगळा करत गावे संरक्षित करण्याची आवश्यकता असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले.
प्राणी आजारी असतील तरच आमच्याशी संबंध येतो, अन्यथा कार्यवाहीचा विषय असेल तर ग्रामपंचायत कार्यालयाकडून नगरपालिकेशी पत्रव्यवहार करून त्यावर नगरपालिका अनुरूप कार्यवाही करते.
- संजय शिंदे, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी
कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठीची यंत्रणा कमकुवत
भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कार्यरत असणारी यंत्रणा ही कमकुवत असून, तुटपुंजा स्वरूपाची आहे. नगरपालिकेकडे असणाऱ्या श्वान पथकाकडेच शहरासह पूर्ण ग्रामीण भागातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी असते. या पथकाला श्वान पकडण्याचे काम हे ठेकेदार पद्धतीने दिलेले आहे. त्यामुळे अत्यल्प कर्मचारी संख्येवर आवश्यक ती दक्षता घेतली जाऊ शकत नाही. ज्यामुळे भटक्या अथवा पिसाळलेल्या कुत्र्यांबाबत तक्रार केली असता त्याकडे एक तर सोईस्कर रित्या काणाडोळा केला जातो अथवा तक्रारीनंतर तकलादू स्वरूपाच्या उपाययोजना राबवून तक्रारदाराची बोळवण केली जाते.
लोकवस्तीलगतच सोडतात पिसाळलेले श्वान
ग्रामीण भागातील बहुतेक प्रशासकीय कार्यालयांना भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी खासगी श्वान पकडणाऱ्या पथकावर अवलंबून राहावे लागत आहे. असे खासगी श्वान पकडणारे व्यक्ती हे पिसाळलेले किंवा भटक्या कुत्र्यांना पकडून वनीकरण किंवा लोकवस्ती असलेल्या परिसरालगत जंगलांमध्ये सोडून देतात. ज्याचा कोणताही ठोस फायदा न होता काही तासातच हे पिसाळलेले किंवा भटके कुत्रे हे लगेच लगतच्या गावांमध्ये जाऊन नागरिक, तसेच जनावरांना त्रास देतात. हे श्वान पकडण्यासाठी स्थानिकांना खासगी लोकांना अनाठायी रक्कम मोजावी लागते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.