पुणे

वरकुटे बुद्रुक ग्रामपंचायतीकडून कीटकनाशक फवारणी

CD

लोणी देवकर, ता. २६ ः वरकुटे बुद्रुक (ता. इंदापूर) येथे डेंगी, मलेरिया या आजारांचे शिरकाव होऊ नये यासाठी खबरदारीची उपाययोजना म्हणून तणनाशक व डास प्रतिबंधात्मक फवारणी करण्याची सुरुवात ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली. गवतावर पंपाच्या साहाय्याने औषध व कीटकनाशक फवारणीला सुरुवात केली. सध्या पाऊस पडत असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून एक खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामपंचायतीकडून संपूर्ण गावात औषध फवारणी सुरू केली.
वाढत्या साथीच्या आजारांना आळा घालण्यासाठी व डासांच्या नियंत्रणाकरिता ग्रामपंचायत प्रशासनाने पावले उचलत फवारणीला सुरुवात केली. यामुळे डासांवर प्रतिबंध मिळत डासांपासून उद्भवणाऱ्या आजारापासून बचाव होईल. गावातील सार्वजनिक ठिकाणे, शाळा, मुख्य प्रशासकीय कार्यालय, तसेच गल्लीबोळातील रस्त्यालगतच्या वाढलेल्या गवतावर कीटकनाशक फवारणी केली. काही ठिकाणी साचलेल्या पाण्यामध्ये जंतुनाशक फवारणी देखील केली.

साथीच्या आजारांसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ग्रामपंचायतीकडून पूर्वनियोजित कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये सर्वप्रथम औषध फवारणी करून, त्यानंतर धूर फवारणी करण्यात येणार आहे. गावात पाणी साठणाऱ्या खड्ड्यांचे व्यवस्थापन देखील करण्यात येणार असून, डासांची उत्पत्ती थांबवण्यासाठी नागरिकांनी आपले घर व परिसर स्वच्छ ठेवावा. आपल्या परिसरात पाण्याची योग्य विल्हेवाट कशी लावली जाईल याची काळजी घ्यावी आणि गावातील नागरिकांनी एक कोरडा दिवस पाळावा.
- पुनम नितीन सोनवणे, सरपंच, वरकुटे बुद्रुक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Land Survey: खासगी भूकरमापक नेमण्याची प्रक्रिया सुरू; मोजणीचे अधिकार देणार, नियमावली निश्‍चितीचे काम अंतिम टप्प्यात

माेठी बातमी! 'फलटण येथील यशवंत बँकेत ११२ कोटींचा घोटाळा'; तब्‍बल १९५ बोगस कर्ज खाती, सातारा जिल्ह्यात खळबळ..

B. M. Sandeep : ‘आरएसएस’ने वाळवीसारखा पोखरला देश: काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव बी. एम. संदीप; सातारा कॉँग्रेस भवनात पदाधिकाऱ्यांची बैठक

Drowning Incident: नदी पात्रातील पाण्यात तरूणाचा बुडून मृत्यू; देवदर्शनासाठी गेला होता कोल्हापूरला

मोठी बातमी! सरसकटऐवजी अटींवर बोट ठेवून नुकसानीचे पंचनामे; उसाच्या भरपाईसाठी पूर्ण पीक पाण्याखाली असण्याची अट; दिवाळीपूर्वी मदत देण्यासाठी लगबग

SCROLL FOR NEXT