pune sakal
पुणे

Pune News : ‘आदिवासी उमेदवारांकरता मोफत मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी’; 1209 उमेदवारांना मिळाला हक्काचा रोजगार

विभागाच्या उपआयुक्त अनुपमा पवार यांनी संवाद साधून रोजगार संधीबाबत मार्गदर्शन केले

सकाळ वृत्तसेवा

मंचर : “राज्य सरकारच्या कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत १८ ते ३८ वयोगटातील इयत्ता दहावी उत्तीर्ण आदिवासी मुला-मुलींसाठी स्पर्धा परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी मोफत प्रशिक्षण दिले जाते.

त्याचा फायदा अनेक विद्यार्थ्यांना हक्काचा रोजगार मिळण्यासाठी झाला आहे. आत्तापर्यंत प्रशिक्षण घेतलेल्या एक हजार २०९ उमेदवारांना शासकीय, निमशासकीय व खाजगी आस्थापनांमध्ये रोजगार मिळालेला आहे.” अशी माहिती कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्राचे प्रमुख सां.ब मोहिते यांनी दिली.

मंचर (ता.आंबेगाव) येथील पोस्ट ऑफिसजवळ आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्रात साडेतीन महिने स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप मोहिते यांच्या हस्ते झाले.

यावेळी ते बोलत होते. यावेळी स्पर्धा केंद्राचे महेश कोलते उपस्थित होते. विषय शिक्षक जितेंद्र त्रिवेदी, शीतल चासकर, रेश्मा आवटे, अर्चना गुंजाळ यांनी उमेदवारांना गणित, इंग्रजी, लिपिक योग्यता चाचणी, सामान्य ज्ञान, मुलाखतीचे तंत्र आदी विषयांवर मार्गदर्शन केले.

“येथे अत्यंत दर्जेदार व परिपूर्ण प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण कालावधीमध्ये उमेदवारांना एक हजार रुपये विद्यावेतन मिळते.रोजगारासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त आहे.”असे प्रशिक्षणार्थी नम्रता किर्वे, श्वेता केंगले, अस्मिता घोटे, चैत्राली शेळके, प्रदीप बोकड, आकाश ढवळे, वैभव मते, तुषार किरवे, आकाश जुमनाके यांनी सांगितले. स्नेहल आंबेकर यांनी सूत्रसंचालन व मंगेश गाडेकर यांनी आभार मानले.

ते म्हणाले, ‘‘प्रशिक्षण कालावधीमध्ये उमेदवारांना एक हजार रुपये विद्यावेतन दिले जाईल. प्रशिक्षणाचे हे १०७ वे सत्र आहे. उमेदवारांना साडेतीन महिने स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण दिले जाते. दरम्यान, हे प्रशिक्षण पूर्ण वेळ असून गणित, इंग्रजी, लिपिक योग्यता चाचणी, सामान्य ज्ञान हे विषय शिकवले जातात. उमेदवारांना स्वयंरोजगार माहिती मार्गदर्शन केले जाते.

प्रशिक्षण पूर्ण झालेल्या शासकीय निमशासकीय व आस्थापनांमध्ये वर्ग तीन पदासाठी निवड होण्यास या प्रशिक्षणाचा लाभ होऊ शकतो. १८ ते ३८ वयोगटातील दहावी उत्तीर्ण मुला-मुलींसाठी हे प्रशिक्षण आहे.

प्रशिक्षण कालावधीमध्ये निवास व भोजनाची उमेदवारांना स्वतः व्यवस्था करावी लागेल. उमेदवारांनी सर्व मूळ शैक्षणिक पात्रतेच्या व सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेल्या जातीच्या दाखल्यासह मुलाखतीसाठी हजर राहावे. अधिक माहितीसाठी मोबाईल क्रमांक (०२१३३) २२३०८१ येथे संपर्क साधावा.

‘‘कौशल्य विकास रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागामार्फत मंचर येथील पोस्ट ऑफिसजवळ आदिवासी उमेदवारांच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये दोन हजार ८०१ उमेदवारांनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे. त्यापैकी एक हजार २०९ उमेदवारांना शासकीय, निमशासकीय व खासगी आस्थापनांमध्ये रोजगार मिळालेला आहे. आदिवासी युवक व युवतींनी मोफत प्रशिक्षणाच्या संधीचा लाभ घ्यावा.’’
-सां. ब. मोहिते, मार्गदर्शन अधिकारी, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती, मंचर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT