पुणे

घोडेगाव, राजगुरुनगरमध्ये शाखा सुरू करणार

CD

मंचर, ता.१३ : येथील धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवी ६७ कोटी ७८ लाख ८२ हजार रुपये आहे. कर्जवाटप ५३ कोटी ८५ लाख ७१ हजार रुपये केले आहे. पतसंस्थेवर कसल्याही प्रकारचे कर्ज नाही. थकबाकीचे प्रमाण ५.७० टक्के आहे. निव्वळ नफा एक कोटी १७ लाख रुपये झाला आहे. घोडेगाव व राजगुरुनगर येथे लवकरच पतसंस्थेच्या शाखा सुरू केल्या जातील.” अशी माहिती धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्थेचे ज्येष्ठ संचालक मंगेश बाणखेले यांनी दिली.
मंचर (ता.आंबेगाव) येथील गणराज मंगल कार्यालयात शनिवारी (ता.१३) २५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंगेश बाणखेले बोलत होते. यावेळी पतसंस्थेचे अध्यक्ष सिताराम लोंढे, उपाध्यक्ष शांताराम बाणखेले, पुरुषोत्तम पटेल, सुदाम बेंडे, दिलीप महाजन, प्रवण (पप्पू) थोरात, मनीष ठक्कर, अश्विनी शेटे, अनिता निघोट, बाबाजी इंदोरे, संदीप रगडे व मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शेवाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमित चिखले उपस्थित होते.

सीताराम लोंढे म्हणाले, “अनेक अडचणीवर मात करून सभासद व संचालक मंडळाच्या विश्वासाने पतसंस्थेने मोठी प्रगती केली आहे. पारदर्शक पतसंस्थेचा कारभार असून युवक-युवती व अन्य उद्योग व्यवसायिकांना तात्काळ कर्ज पुरवठा केला जातो. यावर्षी १२ टक्के लाभांश सभासदांना दिला जाणार आहे.”

यावेळी झालेल्या चर्चेत भास्कर लोंढे गुरुजी, शांताराम जाधव, बाळासाहेब खानदेशे, चित्तरंजन कोऱ्हे, कैलास गांजाळे, रामदास बढे, बयाजी थोरात यांनी भाग घेतला.
शांताराम बाणखेले यांनी प्रास्ताविक तर अनिता निघोट यांनी आभार मानले.

14116

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Laxman Hake : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या विरोधात गुन्हा दाखल; मराठा समाजातील मुलींच्या लग्नाबाबतचे 'ते' वक्तव्य भोवले

माेठी बातमी! 'श्रीगोंदेत खंडणीसाठी व्यापाऱ्याचे अपहरण'; अडीच कोटीची मागणी करत ३० लाख स्वाकारले, जिल्ह्यात खळबळ

IND vs PAK, Asia Cup: पाकिस्तानने टॉस जिंकला, पण भारताच्या मनासारखा निर्णय घेतला; पाहा प्लेइंग - ११

Accident News: भीषण अपघात! हरिद्वारहून परतणाऱ्या कुटुंबाच्या गाडीचा अपघात, ७ जणांचा मृत्यू

Leopard Terror : 'नागराळच्या शिवारात बिबट्या आढळल्याने शेतकऱ्याचा जीव टांगणीला'; मुक्तसंचारामुळे सीमेवरील गावात भीतीचे वातावरण

SCROLL FOR NEXT