पुणे

पिंपळगावात गुणवंत भूमिपुत्र पुरस्काराचे वितरण

CD

मंचर, ता. १७ : पिंपळगाव- खडकी (ता. आंबेगाव) येथील श्रीराम विद्यालयात स्व. दिनकरराव आवटे यांच्या ३८व्या स्मृतीदिनानिमित्त जनमित्र दिनकरराव आवटे मित्रमंडळाच्या वतीने गुणवंत भूमिपुत्र पुरस्कार वितरण, दहावीचा १०० टक्के निकाल लागलेल्या ३८ शाळांचा व विविध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना ४३ हजार रुपये रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील, लक्ष्मीबाई पाटील, दिनकरराव आवटे, जयसिंगराव भालेराव, डॉ. रामचंद्र काळे यांच्या प्रतिमेचे पूजन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षणाधिकारी संगीता बांगर- घोडेकर, दत्ता बांगर, गोविंद खिलारी, के. के. निकम, माथाजी पोखरकर, दादाभाऊ पोखरकर, महेश भालेराव, मयूर आवटे यांच्या हस्ते करण्यात आले.
आवटे मित्रमंडळाचे अध्यक्ष भरत चिखले यांनी प्रस्ताविक केले. श्रीराम विद्यालयाच्या कामासाठी सीएसआर फंडातून १८ लाख रुपये उपलब्ध करून देणार आहे, असे संगीता बांगर यांनी सांगितले. तसेच, संविधानाचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांनी आधुनिक ज्ञान आत्मसात करून आपल्या कुटुंबाचा नावलौकिक निर्माण करावा, असे आवाहन प्रा सुभाष वारे यांनी केले.
यावेळी कुकडी पाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अभियंता दत्ता कोकणे, कृषी तज्ञ ॲड. राहुल पडवळ, स्त्रीरोग तज्ञ डॉ. सीमा खिंवसरा, आदर्श सरपंच अनिल गाडे, प्रयोगशील शेतकरी पाराजी बांगर, आंतरराष्ट्रीय अबॅकश विजेत्या धनिष्का डोके, आदर्श मुख्याध्यापक लक्ष्मण काळे व आदर्श अभियंता शरद शिंदे या गुणवंत भूमिपुत्रांना शाल, श्रीफळ, स्मृती चिन्ह देऊन दिनकरराव आवटे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाची व्यवस्था याकूब इनामदार, सुनील वाळुंज, किसनराव आवटे यांनी पाहिली. याप्रसंगी सरपंच दीपक पोखरकर, प्रभाकर बांगर यांची मनोगते झाली. आत्माराम जगदाळे व सतीश जाधव यांनी सूत्रसंचालन,तर प्राचार्य दादाभाऊ फापाळे यांनी आभार मानले.

स्पर्धेतील प्रथम क्रमांकातील विजेते
निबंध- वेदिका पोखरकर (मोठा गट), पूर्वा शिंदे (लहान गट), वकृत्व स्पर्धा- सिद्धी अरगडे (मोठा गट), नमस्वी गोरडे (लहान गट), रांगोळी स्पर्धा- श्रावणी बांगर (मोठा गट), ईश्वरी राक्षे (लहान गट).

14134

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs UAE Live: बिचारे... PCB ने खेळाडूंना तोंडावर पाडले, बॅगा घेऊन स्टेडियमवर पोहोचले; मॅच रेफरी Andy Pycroft च राहिले, टॉसही हरले

Pune: 'आर्टी'च्यावतीने शनिवारी पुण्यात अभियंता उद्योजक कार्यशाळा

Latest Marathi News Updates: कन्नडच्या एसडीएम कार्यालयासमोर कोळी समाजाचे आमरण उपोषण

Pachod News : गुन्हा दाखल केलेल्या इसमांवर पोलिसांनी कारवाई न केल्याने एकाने व्हिडीओ बनवून केले विष प्राशन; घाटी रुग्णालयात उपचार सुरू

PAK vs UAE Update: पाकिस्तानची लाचारी पुन्हा दिसली... पैशांसाठी आत्मसन्मान ठेवला गहाण; Jay Shah यांनी कान टोचताच खेळायला तयार

SCROLL FOR NEXT