मंचर, ता. ८ : पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (कात्रज डेअरी) यांच्या वतीने आंबेगाव तालुक्यात १३ गावांत सहकारी दूध संस्थांमध्ये जनावरांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते. यामध्ये एकूण ९०८ जनावरांची तपासणी करण्यात आली.
‘‘श्रीराम (पिंपळगाव), किसान (वाळुंजवाडी), श्रीकृष्ण (श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग), दत्तात्रेय (पहाडदरा), दत्तकृपा (वडगाव पीर), विकास (मंचर), भीमाशंकर (मंचर), नरसिंह (रांजणी), श्री दत्त (महाळुंगे पडवळ), कळबादेवी (शेवाळवाडी), भीमाशंकर (शिंदेमळा), आधार (तांबडेमळा) व सटवादेवी (कराळेवाडी)आदी दूधसंस्थांच्या सहकार्याने शिबिरे झाली,’’ अशी माहिती अवसरी दूध शीतकरण केंद्र प्रमुख सचिन हिंगे पाटील व वरिष्ठ पशुधन पर्यवेक्षक डॉ. महेशकुमार जाधव यांनी दिली.
याप्रसंगी कात्रज पशुखाद्य पशुवैद्यकीय औषधे, मका बी-बियाणे, मिनरल मिक्चर, सेंद्रिय खते याबाबतच्या सुविधांची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली. तसेच जनावरांना आजार होऊ नयेत म्हणून जनजागृती करणाऱ्या माहिती पत्रकांचे वाटप केले. विकास बांगर, अजित ढोबळे, प्रशांत शिंदे, विक्रम पानसरे, वैभव पेहळे, यश गावडे, संतोष डोळे, सुजाता शेटे आदींनी व्यवस्था पाहिली.