पुणे

मंचरमधील आंदोलनप्रकरणी २५० जणांवर गुन्हा दाखल

CD

मंचर, ता. ४ : पिंपरखेड (ता. शिरूर) येथे रोहन विलास बोंबे (वय १३) या शालेय विद्यार्थ्याचा बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. याबाबत वन विभागाचे लक्ष वेधण्यासाठी पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचरजवळील गायमुख- नंदीचौक (ता. आंबेगाव) येथे ३ नोव्हेंबर रोजी केलेल्या रस्ता रोको आंदोलनात सहभागी झालेल्या ३१ जणांसह २०० ते २५० कार्यकर्त्यांविरुद्ध मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल अजित रघुनाथ पवार यांनी गुरुवारी (ता. ६) रात्री दहा वाजता मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. ‘बेकायदेशीर जमाव जमवून महामार्गावरील वाहने अडवून लोकसेवकांनी दिलेल्या आदेशाचे पालन न करता लोकसेवकांचे सार्वजनिक कार्य पार पाडण्यास अटकाव करून रस्ता रोको आंदोलन केले,’ असे फिर्यादीत नमूद केले आहे.
शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख सुरेश भोर, शिवसेनेचे नेते रमेश येवले, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अरुण गिरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर, दत्ता गांजळे, संपत ऊर्फ बाळासाहेब बाणखेले, नित्यानंद येवले, धोंडिभाऊ भोर, कुणाल बाणखेले, विशाल वाबळे, पूजा वळसे पाटील, नीलेश वळसे पाटील, नरेश ढोमे, शरद बोंबे, सचिन बोंबे, भोलानाथ पडवळ, किरण ढोबळे, दिलीप वाळुंज, रवी वळसे पाटील, सुभाष पोकळे, दामू घोडे, विकास गायकवाड, जयेश भालेराव, वनाजी बांगर, अजित चव्हाण, दिपक पोखरकर, भाऊसाहेब सांवत, राजेंद्र दाभाडे, विकास वरे, सौरभ ऊर्फ वैभव पोखरकर यांच्यासह एकूण ३१ जण व अन्य २५० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. सार्वजनिक सुव्यवस्था भंग, वाहतूक अडथळा, अधिकाऱ्यांना काम करू न देणे व सरकारी नियम न पाळणे असे गुन्ह्याचे स्वरूप आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"घरचेच काम देत नाहीत बाहेरचे काय देणार ?" प्रसिद्ध दिग्दर्शकाचा सख्खा भाऊ करतोय ड्रायव्हरचं काम; मुलगा गंभीर आजारी

Latest Marathi News Live Update : बार्शीतील महाआघाडीच्या प्रचारासाठी उद्या एकनाथ शिंदेंची जाहीर सभा

ना ओरडली, ना मारलं... जेहला धाक दाखवण्यासाठी करिना कपूरने जे केलं ते पाहून नेटकरी म्हणतात, 'ही तर आमच्या आईसारखीच...'

T20 World Cup: भारताच्या पहिल्या सामन्यासाठी संजू सॅमसनला संधी, तर इशान किशन, कुलदीप यादव प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर

Lonavala: दुर्गा श्वानामुळे सापडला ४०० फूट खोल दरीतला मृतदेह; ड्रोन तंत्रज्ञानाचीही झाली मोठी मदत

SCROLL FOR NEXT