पुणे

मंचरमध्ये उमेदवारांचे भवितव्य होणार मशिन बंद

CD

मंचर, ता. १ : नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी (ता.२) मतदान होणार आहे. प्रशासनातर्फे सर्व तयारी पूर्ण झाली आहे. क्रीडा संकुल येथून मतदान यंत्रांचे (ईव्हीएम) वाटप सोमवारी (ता.१) निवडणूक प्रतिनिधींना करण्यात आले. नगरपंचायतीतील एकूण १६ प्रभागांसह नगराध्यक्षपदासाठी ही निवडणूक होत आहे.
आंबेगाव-जुन्नर विभागाचे प्रांत अधिकारी गोविंद शिंदे व तहसीलदार डॉ. सचिन वाघ यांनी मत मोजणी केंद्राला भेट देऊन पाहणी केली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अंजली कुलकर्णी, साहाय्यक निवडणूक अधिकारी गोविंद जाधव, वरद थोरात यांच्यासह निवडणूक प्रक्रियेतील कर्मचारी उपस्थित होते. ‘‘प्रक्रिया सुरळीत, सुरक्षित व पारदर्शक राहावी यासाठी प्रशासन सज्ज आहे.” असे डॉ.वाघ यांनी सांगितले. कुलकर्णी म्हणाल्या, ‘‘यंत्रांचे वाटप करताना प्रतिनिधींना त्यांच्या मतदान केंद्रांनुसार आवश्यक साहित्य, मतदान नोंदवही, सुरक्षा सील आदी साहित्य देण्यात आले. यंत्रांची प्राथमिक तपासणी त्यांच्या उपस्थितीत करून सर्व यंत्रे व्यवस्थित कार्यरत असल्याची खात्री करण्यात आली.’’ मतदान केंद्रांवरील प्रक्रिया, मतदार ओळख पडताळणी, मतदान गोपनीयता, यंत्र हाताळणी तसेच दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी सुलभ सुविधा याबाबत जाधव यांनी मार्गदर्शन केले.

मतदार
पुरुष : ८ हजार ६६५
महिला : ८ हजार ७१८
तृतीयपंथी : ०१
एकूण : १७ हजार ३८४
मतदान केंद्रे : २४

एक नगराध्यक्ष पद : ६ उमेदवार
१६ नगरसेवक पद : ६७ उमेदवार (एक बिनविरोध)


4681

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NAM : भारताचा सर्वात मोठा विजय, ९३ धावांनी नामिबियाला नमवले; पाकिस्तानला चेपले, रविवारी IND vs PAK मध्ये Super 8s चा फैसला

IND vs NAM : भारतीय संघावर 'Fixing' चा आरोप! इशान किशनच्या विकेटवरून पाकड्यांनी वाद पेटवला, नेमकं काय घडलं?

Imran Khan Jail Torture : इम्रान खान यांचा तुरुंगात छळ सुरू ; एक डोळा पूर्णपणे निकामी होण्याच्या मार्गावर!

Education Reform : विद्यापीठांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत का ? सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांचा सवाल

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात पायलट दोषी? इटालियन वृत्तपत्राच्या दाव्यावर भारताची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT