पुणे

कर्तृत्वातून उभे राहिलेले समदडिया

CD

डी. के. वळसे पाटील

मंचर : वयाच्या तिसऱ्या वर्षी पोलिओमुळे उजव्या पायाला आलेल्या अपंगत्वावर मात करून अभिजित दिनेश समदडिया (वय५०) यांनी धैर्य, चिकाटी आणि परिश्रमाच्या बळावर कर्तृत्वाची नवी ओळख निर्माण केली. मंचर व पुण्यात ज्वेलरीची दुकाने सुरू करून त्यांनी ७० जणांना रोजगार दिला आहे. सामाजिक व धार्मिक कार्यातही त्यांचा सहभाग उल्लेखनीय असून त्यांची यशोगाथा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
लहानपणापासूनच वडील (स्व)दिनेश यांचे व्यापाराचे संस्कार लाभले. बी. कॉम. पर्यंत शिक्षण त्यांनी पूर्ण केले. पोलिओमुळे चालण्यात अडचणी, पायांवर अनेकदा झालेले अपयशी ऑपरेशन्स या सर्व अडचणींनीही त्यांचे स्वप्न रोखू शकले नाही. धैर्य ठेऊन त्यांनी सन २००० मध्ये मंचर येथे ‘उत्तमभाग्य ज्वेलर्स’ सोन्या-चांदीच्या पेढीची मुहूर्तमेढ रोवली. वडिलांचे मार्गदर्शन लाभले; परंतु त्यांचे छत्र लवकरच हरपले. तरीही अभिजित खचले नाहीत. आई ललिता, पत्नी ममता, मुलगा यश, कन्या जैना यांच्या पाठिंब्याच्या जोरावर यश संपादन करता आले. याचा त्यांना सार्थ अभिमान आहे. आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे हसतमुख स्वागत करणे हे त्यांचे स्वभाव वैशिष्ट्य आहे. व्यवसायाबरोबरच सामाजिक क्षेत्रातही त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. दिव्यांग बांधवांसाठी क्रिकेट स्पर्धा, आरोग्य शिबिरे, दिवाळीत फराळ वाटप, ज्येष्ठांना काठी वाटप आदी सामाजिक उपक्रम ते राबवितात. एकलहरे येथील पांजरपोळ ट्रस्टतर्फे सुरू असलेल्या त्रिभुवन तारक तीर्थ मंदिराच्या बांधकामाची धुरा त्यांनी सांभाळली आहे. जैन समाजाचे कार्य, साधुसंतांची सेवा आणि विविध सामाजिक उपक्रमांत त्यांची सदैव अग्रभागी उपस्थिती जाणवते. खऱ्या अर्थाने कार्यशील, उद्यमशील आणि प्रेरणादायी असे अभिजित समदडिया यांचे कार्य दिव्यांगाबरोबर अन्य तरुणांना प्रेरणा देणारे ठरत आहे.


4692

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NHAI-Jio safety alert system: ‘हायवे’वरील धोक्यांचा इशारा आता मोबाइलवर आधीच कळणार ; 'NHAI-Jio' मध्ये करार!

मैदानी चाचणी फेब्रुवारीपासून! पोलिस भरतीत एका पदासाठी ८३ उमेदवार; इच्छुकांना रविवारपर्यंत करता येईल अर्ज; १५,६३१ पदांची भरती

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत सरकारचं मोठं विधान; कर्मचाऱ्यांची 'ही' मागणी फेटाळून लावली

Pune Voter List : मतदार यादीवर हरकत नोंदविण्यासाठी आज शेवटचा दिवस; हरकतींची संख्या १२ हजाराच्या वर!

Ahilyanagar Leopard Attack : बिबट्याच्या अचानक हल्ल्याने भागूबाई खोडदे यांचा बळी; पारनेर तालुक्यात भीतीचं वातावरण!

SCROLL FOR NEXT