माळेगाव, ता.२५ः माळेगाव बुद्रूक (ता.बारामती) विविध कार्यकारी सोसायटीने नुकतेच ७५ वर्षात यशस्वीरीत्या पदार्पण केले. संस्थेने कोट्यवधींच्या व्यवहाराचा टप्पा गाठला आहे. सभासदांच्या आर्थिक प्रगतीस हातभार लावल्यामुळे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने माळेगाव सोसायटीला यंदाच्या आर्थिक वर्षात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मानाची ढाल देण्यासाठी जाहीर केले.
सोसायटीची स्थापना २९ मे १९५१ रोजी करण्यात आली. माळेगावच्या तत्कालीन ज्येष्ठ मंडळींना एकत्रित करून कै. शिवाजीराव साहेबराव पैठणकर यांनी या संस्थेची स्थापना केली. सध्या संस्थेचे ७३७ सभासद आहेत. सभासद शेअर्स रुपये ४१ लाख ४९ हजार ६० इतके आहे. तसेच ठेवी एक कोटी ९२ लाख ३१ हजार ५९८ रुपये इतक्या आहेत. या वर्षात संस्थेने आठ लाख २० हजार ४२३ रुपये नफा मिळवलेला आहे. संस्थेच्या प्रशासनाने आजवर अत्यंत पारदर्शक काम केल्यानेच ही आशादायक आर्थिक स्थिती निर्माण होऊ शकली. अमृत महोत्सवीवर्षात संस्थेला मानाची ढाल देण्याचे जाहीर केल्याने सभासदांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
दरम्यान, माळेगाव सोसायटीच्या प्रगतीमध्ये संस्थेचे मार्गदर्शक माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष बाळासाहेब तावरे, रंजनकुमार शंकरराव तावरे यांचा सिंहाचा वाटा आहे. तसेच खरेदी विक्री संघाचे माजी संचालक मनोज नामदेवराव सस्ते यांचेही योगदान महत्त्वपूर्ण ठरले आहे, अशी माहिती सोसायटीच्या अध्यक्षा सीमा सस्ते, उपाध्यक्षा शुभांगी तावरे यांनी दिली. यावेळी संचालक निशिगंध तावरे, वसंतराव तावरे, संपतराव लोणकर, शशिकांत तावरे, सचिन पैठणकर, दिग्विजय जाधवराव, दिलीप बुरुंगले, विजय भोसले, अभिजित तावरे, वीरेंद्र भुंजे, प्रताप तावरे, गौरव निंबाळकर, विनोद सस्ते, रमेश नलवडे, प्रमोद जाधव, सचिव विकास तावरे, मदतनीस शशिकांत देवकाते आदी पदाधिकारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.