माळेगाव, ता. १३ : माळेगाव, ता. १३ : माळेगाव खुर्द (ता. बारामती) येथे येत्या १७ ते २४ जानेवारी दरम्यान प्रात्यक्षिकयुक्त कृषी प्रदर्शन आयोजित केले आहे. हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान (विना माती) वापरून शेती करणे शक्य आहे. या तंत्राद्वारे विविध पद्धतीने भाजीपाला पिकांचे उत्पादन कशा पद्धतीने घेता येईल, याची प्रात्यक्षिके पाहण्याची संधी शेतकरी बांधवांना मिळणार आहे, अशी माहिती कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ यशवंत जगदाळे यांनी दिली.
देशातील भाजीपाला व इतर फळपिकांचे उत्पादन वाढत आहे. वातावरणातील बदलांना सामोरे जाण्यासाठी शेतकरी बांधवांना आधुनिक शेतीकडे वळणे गरजेचे आहे. भविष्यातील शेती अधिक उत्पादनक्षम व शाश्वत करण्यासाठी नैसर्गिक साधनसंपत्ती तसेच शेतीमध्ये आवश्यक असणाऱ्या इतर विविध निविष्ठांचा वापर काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे. त्या पार्श्वभूमीवर अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रात प्रात्यक्षिकयुक्त कृषिक २०२६ प्रदर्शनाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
कृषी प्रदर्शनाबाबत माहिती देताना जगदाळे म्हणाले की, सध्या भारतामध्ये हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागला आहे. या तंत्रज्ञानामुळे कमी जागा, कमी खत, कमी पाणी व कमीत कमी कीटकनाशकांचा वापर करून विषमुक्त भाजीपाला उत्पादन घेता येते.
कमी जागा, कमी खत, कमी पाणी
जमिनीचे विभाजन आणि अयोग्य खत आणि पाणी व्यवस्थापन यामुळे सध्या महाराष्ट्रातील जमिनीचा पोत खराब आहे. अचानक होणारा वातावरणातील बदल. यावर एक पर्यायी तंत्रज्ञान म्हणजे हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान वापरून मातीविना शेती करणे आणि कमी जागा, कमी खत, कमी पाणी व कमी कीटकनाशक वापर या तत्त्वांचा वापर करून भाजीपाला उत्पादन घेण्यावर सध्या नवीन पिढीचा जास्त भर आहे, अशी माहिती अधिकारी यशवंत जगदाळे यांनी दिली.
हायड्रोपोनिक्स शेतीचे फायदे :
१) कमी जागा, कमी खत, कमी पाणी व कमी कीटकनाशक वापर या तत्त्वानुसार भाजीपाला उत्पादन घेता येते.
२) संशोधनाच्या निष्कर्षातून असे सिद्ध झाले आहे कि हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान वापरून पाण्याची ८० ते ९० टक्के बचत.
३) नियंत्रित वातावरणामध्ये आपण वर्षभर बिगर हंगामी भाजीपाला उत्पादन घेऊ शकतो.
४) विषमुक्त भाजीपाला उत्पादन घेण्यास सोईस्कर पद्धत आणि या उत्पादनांना बाजारामध्ये चांगली किंमत मिळते.
५) भाजीपाला वाढीचा वेग जास्त असतो व कीड व रोगांचे प्रमाण कमी आढळते.
६) पर्यावरणाचा ऱ्हास कमी होतो आणि टेरेस गार्डन किंवा रुफ टॉफ गार्डन मध्ये या पद्धतीचा वापर जास्त प्रमाणात होत आहे.
७) शहरातील लोकांना घरच्या घरी पौष्टिक स्वतःचा भाजीपाला तयार करणे शक्य.
८) जमिनीतील उत्पादनापेक्षा ३ ते ४ पटीने भाजीपाला उत्पादन जास्त मिळते.
९) या तंत्रज्ञानामुळे सर्व जीवनसत्त्व व चवदार भाज्यांचे उत्पादन घेता येते.
१०) मातीविना शेती असल्यामुळे यामध्ये जमिनीतून येणारी बुरशी, कीड व तणांचा प्रादुर्भाव यामध्ये होत नाही.
03019
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.