मकरंद ढमाले
माले : मुळशी धरण भागातील ग्रामस्थ वैद्यकीय उपचारांसाठी प्रामुख्याने माले (ता.मुळशी) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर अवलंबून आहेत. परंतु वैद्यकीय कर्मचाऱ्यांची अनुपलब्धता, औषधांचा तुटवडा, अस्वच्छ वातावरण, सेवांचा ढासळलेला दर्जा यामुळे सेवेच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
मुळशी धरण भागातील, माले परिसरातील ग्रामस्थ हक्काचे म्हणून माले आरोग्य केंद्राकडे पाहतात. आंबडवेट, कुळे, कोळवण, काशिग, शेरे, खेचरे, माले ही उपकेंद्र येतात. येथे सोमवारी (ता.३) सकाळी १०.३० वा पाहणी केली असता १२ पैकी ६ कर्मचारी आले नव्हते, रजेवर होते, किंवा दुसरीकडे उपकेंद्रावर कामासाठी गेले होते. सिंबायोसिस संस्थेच्या १३ प्रशिक्षणार्थी (इंटर्न) डॉक्टर होत्या. त्याच रुग्णांना तपासत, उपचार करत होत्या.
आरोग्य केंद्रासाठी दोन वैद्यकीय अधिकारी डॉ. रवी चव्हाण, डॉ. आसिफ ख्वाजा हे आहेत. विशेष म्हणजे हे दोघेही केंद्रात नव्हते. माहिती घेतली असता ते आंबडवेट उपकेंद्रावर एनक्ययुएस हे राष्ट्रीय नामांकनाची माहिती भरण्यासाठी गेले असल्याचे सांगण्यात आले. पूर्वीच्या माले उपकेंद्रातून हा जनसेट आरोग्य केंद्रात आणण्यात आला. तेव्हापासून तो बंदच आहे. दुरुस्तीबाबत पत्रव्यवहार करण्यात आला; परंतु निधीअभावी दुरुस्ती झाली नाही. त्यामुळे हा जनसेट शोभेची वस्तू झाला आहे. रुग्णालयात केवळ एक इन्व्हर्टर आहे. तो दोनतीन खोली पुरताच आहे.
समस्या
आरोग्य केंद्रात प्रवेश करतानाच तुटलेले प्रवेशद्वार
ठिकठिकाणी साठलेले पाणी
परिसरात वाढलेले गवत यांनी रुग्णांचे स्वागत होते
इमारतीच्या खिडक्यांची जाळी तुटलेली
पाइप तुटलेले
वैद्यकीय सामान इतस्ततः ठेवलेले, त्यावर साचलेली धुळ
जनसेट अनेक वर्षांपासून बंद आहे
सुरक्षा कर्मचारी उपलब्ध नाही
स्वखर्चाने काही डोस खरेदी
श्वानदंशावरील वरील जिल्हा परिषदेकडून मागवण्यात आली आहेत. सद्यःस्थितीत स्वखर्चाने काही डोस खासगी खरेदी करून ठेवली आहेत. आंबडवेट उपकेंद्रावर एनक्ययुएस हे राष्ट्रीय नामांकनाची प्रक्रिया करावी लागते. वैद्यकीय अधिकारी कायम उपलब्ध असतात. आरोग्य केंद्राचे वायफायचे बिल थकले आहे. कर्मचाऱ्यांना उपकेंद्रांवरच कामे करण्यास जावे लागते. कर्मचारी कमी पडतात. जनसेटच्या दुरुस्तीसाठी पाठपुरावा केला आहे, असे वैद्यकीय अधिकारी डॉ. रवी चव्हाण, डॉ.आसिफ ख्वाजा यांनी सांगितले.
‘काम कमी देखावा फार’
योग्य त्या नियंत्रणाअभावी माले प्राथमिक आरोग्य केंद्र हे निवांत रुग्णालय झाले आहे. कर्मचारी केव्हाही येतात-जातात, रात्रीच्यावेळी उपलब्ध नसतात. शासकीय कामासाठी बाहेर होतो सबब देणे. सिंबायोसिस वैद्यकीय संस्थेच्या १३ वैद्यकीय प्रशिक्षणार्थी येथे प्रशिक्षण घेण्यासाठी नेमण्यात आल्या आहेत. बहुतांश रुग्णसेवेचे काम हे सिंबायोसिस वैद्यकीय संस्थेतील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांकडूनच केले जाते. त्यामुळे येथे कर्मचारी इतर कामे करत असतात. त्यामुळे ते इतर कोणती कामे करत असतात हाच संशोधनाचा विषय आहे. वैद्यकीय रक्त तपासणी करणारे कर्मचारी वेळेवर उपलब्ध नसतात. संध्याकाळी वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसतात. ‘काम कमी देखावा फार’ असे अनेक आरोप ग्रामस्थांनी केले आहेत.
1234
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.