पुणे

मुढाळेतील १३ लाभार्थ्यांना विविध वस्तूंचे वाटप

CD

मोरगाव, ता. २२ : भारत सरकारच्या माळेगाव खुर्द येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या राष्ट्रीय अजैविक स्ट्रेस प्रबंधन संस्था यांच्यामार्फत डी.ए.पी.एस.सी. हा कार्यक्रम मागासवर्गीयांचे जीवनमान उंचाविण्यासाठी राबविला जातो.
या कार्यक्रमांतर्गत मुढाळे या गावातील १३ लाभार्थ्यांना मोटर, पाण्याची टाकी, शिलाई मशिन, ताडपत्री, सायकल आदी वस्तूंचे वाटप केले. याकामी मुढाळे गावचे सरपंच जयपाल साळवे यांनी पुढाकार घेऊन पाठपुरावा केला होता.
संस्थेचे संचालक डॉ. के. सामी रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी डी.ए.पी.एस.सी. समितीचे अध्यक्ष डॉ. नितीन कुराडे, समितीचे सदस्य डॉ. अविनाश निर्मळे, डॉ. धनंजय नांगरे, डॉ. सचिन पवार, डॉ. विजयकुमार काकडे, संस्थेचे आदित्य वाघमारे, अजय कांबळे, मुढाळे गावचे सरपंच जयपाल साळवे, नवनाथ साळवे, प्रशांत साळवे, काजल साळवे, गौरी साळवे, सूरज गायकवाड, अतुल साळवे, दादासो सकाटे, विठ्ठल पोटे, उमेश सकाटे, सुनील साळवे, ताराचंद साळवे, सोमनाथ साळवे, निर्मला साळवे आदी उपस्थित होते. संस्थेने राबविलेला उपक्रम आणि या उपक्रमासाठी निवडलेले मुढाळे गाव, यामुळे सरपंच जयपाल साळवे यांनी संस्थेचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: राजस्थानमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपला इशारा, निवडणुकीवरुन दिला 'हा' अल्टिमेटम

Latest Marathi News Update : दिवसभरात देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Marathwada Crime : कडेठाण येथे मुलाने केला पित्याचा खून; प्रेत पुरले घरात; आठ दिवसानंतर घटना उघडकीस!

Theur Crime : पिऊन रस्त्यावर पडलेल्या व्यक्तीला उचलुन बाजुला करण्याकरीता गेलेल्या दोघांना तिघांनी केली मारहाण!

Aadhaar ATM : एटीएम अन् पाकिटही हरवलं? टेन्शन घेऊ नका, लगेच पैसे काढण्यासाठी उपयोगी येईल फक्त आधार नंबर; सोपी आहे प्रोसेस

SCROLL FOR NEXT