पुणे

अपुऱ्या जागेमुळे खातेदारांची गैरसोय

CD

मोरगाव, ता. १ : तीर्थक्षेत्र मोरगाव (ता. बारामती) येथे पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कामकाज करताना अपुरी इमारत व अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे खातेदारांची मोठी गैरसोय होत आहे. जिल्हा व्यवस्थापनाने या ठिकाणी प्रशस्त इमारत व पुरेशी कर्मचाऱ्यांची सोय करावी, अशी मागणी खातेदार व स्थानिक नागरिक यांच्याकडून होत आहे.
गेली अनेक वर्षांपासून स्थानिक पदाधिकारी यांच्यासह बँकेचे व्यवस्थापन यांच्याकडून इमारतीची व प्रशस्त जागेची पाहणी होत आहे. मात्र, वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप इमारतीचा व जागेचा प्रश्न मार्गी लागला नसल्याची परिस्थिती आहे. बारामती तालुक्यात लॉकर सुविधा नसलेली पीडीसीसी बँकेची मोरगाव एकमेव शाखा आहे. पीडीसीसी बँकेचे खातेदार असणाऱ्या खातेदारांना सोने सुरक्षित ठेवण्यासाठी लॉकरची आवश्यकता आहे. अनेकवेळा मागणी करूनही लॉकरचा विषय सुटला नसल्याची वस्तुस्थिती आहे.
मुळातच बँकेचे कामकाजच अपुऱ्या जागेत चालते. त्यामुळे सोने तारण करतानाही खातेदारांना पुरेशी सुरक्षित जागा उपलब्ध होत नाही. या नियमित कामकाजामध्ये बँकेच्या अधिकाऱ्यांकडून हे सोने तारण करून घेतले जाते. याशिवाय मोरगाव मध्यवर्ती ठिकाण असल्याने या ठिकाणी महिला बचत गट, ग्रामपंचायत, सामाजिक संस्था, मजूर संस्था, शेतकरी गट, पाणी वापर संस्था यांची मोठ्या प्रमाणात खात्यांची संख्या आहे.
सलग सुट्ट्यानंतर बँक चालू झाल्यावर गर्दीचे प्रमाण अधिक राहते. त्यावेळी या ठिकाणी कर्मचारी आणि खातेदार यांच्यात वेळेच्या मर्यादांमुळे वादविवादाचे प्रसंग निर्माण होतात. यापूर्वी या ठिकाणी जिल्हा बँकेचे पदाधिकारी व अधिकारी यांनी प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थितीची माहिती घेतली आहे. त्यामुळे जागेचा व प्रशस्त इमारतीचा प्रश्न मार्गी लागेल, अशी ग्राहकांना अशा होती. मात्र, पाहणी केल्यानंतर या ठिकाणची परिस्थिती जैसे थे असल्यामुळे ग्राहकांची आशा फोल ठरली आहे.
मोरगाव हे तीर्थक्षेत्र असल्यामुळे या ठिकाणी कोणत्याही योजनांचा प्रस्ताव पाठविल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून प्राधान्याने निधी उपलब्ध करून दिला जातो. मात्र, बँकेच्या इमारतीची गैरसोय ही गेली अनेक वर्षांचा प्रश्न आजही अधांतरी आहे. या इमारतीत व इमारतीलगत प्रसाधनगृहाची व्यवस्था नसल्यामुळे बँकेच्या कर्मचाऱ्यांसहित खातेदारांची गैरसोय होते. याशिवाय ही इमारत जुनी व जीर्ण झाली होती. तात्पुरती डागडुजी व रंगरंगोटी करून तात्पुरत्या स्वरूपात येथे कामकाज सुरू आहे.

यासंदर्भात मोरगाव शाखेचे शाखा अधिकारी डी. एम. गायकवाड म्हणाले की, ‘‘इमारतीचा प्रश्न वरिष्ठ कार्यालयाकडून सोडवण्यात येईल. त्यांना येथील समस्या माहीत आहेत.’’

यापूर्वी प्रत्यक्ष मोरगावमध्ये जागा किंवा भाडेतत्त्वावर इमारत पाहण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, अपेक्षेप्रमाणे जागा न मिळाल्यामुळे सद्यःस्थितीत जाहिरात देऊन अर्ज मागवले आहेत. जरी जागा उपलब्ध झाली तरी भाडेतत्त्वावर सध्या इमारत घेण्याचा बँकेचा निर्णय आहे. प्रशस्त व सोयीसुविधा युक्त जागा कोणाची असल्यास त्यांनी बँकेशी संपर्क करावा. लॉकर सुविधा देण्याची बँकेची लगेच तयारी आहे. मात्र, इमारतीच्या गैरसोयीमुळे लॉकर सुविधा अद्याप सुरू केली नाही. इमारतीचा प्रश्न सुटल्यानंतर सोयी सुविधा व लॉकर सुविधा दोन्ही त्वरित उपलब्ध केल्या जातील.
- संदीप जगताप, विभागीय अधिकारी, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक, बारामती

03357

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कुटुंबियांना भेटताच अश्रुंचा बांध फुटला, सुप्रिया सुळेंसह सुनेत्रा पवारांनी हंबरडाच फोडला; काळीज पिळवटून टाकणारा व्हिडिओ समोर

Cricketer Arrest: धक्कादायक भारताच्या माजी क्रिकेटपटूला अटक! दारूच्या नशेत ३ गाड्यांना दिली धडक

वडिलांचे स्वप्न पूर्ण केल पण स्वतःचं तसंच राहिलं; अजितदादांसोबत अपघातात २९ वर्षीय पिंकी मालीचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : अपघातापूर्वी पायलटचा थेट ATC सोबत संवाद, सांगितली महत्वाची माहिती..

Ajit Pawar Plane Crash: अजितदादांमुळे बीडकरांचं ४५ वर्षांचं स्वप्न झालं होतं पूर्ण; पालकमंत्रीपद स्वीकारल्यापासून 'हे' बदल केले

SCROLL FOR NEXT