पुणे

घोड नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

CD

महाळुंगे पडवळ, ता. २६ : हुतात्मा बाबू गेनू सागर (डिंभे धरण) ८३ टक्के भरले आहे. धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी घोड नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे आंबेगाव आणि शिरूर तालुक्यातील नदीकाठच्या ३५ गावांना कुकडी पाटबंधारे विभागाकडून सतर्कतेचा इशारा दिला आहे.
डिंभे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पाणीसाठा नियंत्रित करण्याकरिता धरणाच्या सांडव्यावरून घोड नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. घोड नदीच्या काठावर असलेल्या ग्रामपंचायतींना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने, नदीजवळ किंवा पाण्याच्या प्रवाहात कोणीही जाऊ नये. मासेमारी किंवा इतर कोणत्याही कामासाठी नदीपात्रात उतरू नये. प्रशासनाच्या वतीने आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे.
‘नदीमधील पाण्याचे पंप, नदी काठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे हलविण्यात यावेत. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे,’ असे आवाहन कुकडी पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी दत्तात्रेय कोकणे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दारू ड्रग्ज हुक्का...! पुण्यातल्या रेव्ह पार्टीत बड्या राजकीय नेत्याचा पती सापडला! २ महिलांसह ५ पुरुषांना घेतलं ताब्यात

Eknath Shinde : धैर्यशिल मानेंना खासदार करण्यासाठी एकनाथ शिंदेंनी जादू केली, पुत्र श्रीकांत शिंदेंचे वक्तव्य

कपाळावर मोठं कुंकू, केसात गजरा आणि नववार साडी, झी मराठी वाहिनीवर दिसणार निर्मिती सावंत, नक्की कोणती भूमिका साकारणार

American Airlines Flight : उड्डाण करतानाच विमानाच्या लॅंडिंग गियरमध्ये आग, १७३ प्रवाशांसह ६ क्रू मेंबर्सचा जीव टांगणीला अन्...

Satej Patil : माणसं येतात जातात परंतु माणसं तयार करणारी फॅक्टरी बंटी पाटील हाय..., आमचं ठरलयं नाही आता त्यांचा करेक्ट कार्यक्रमचं

SCROLL FOR NEXT