हिर्डोशी, ता. १५: मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत भोर पंचायत समिती व ग्रामपंचायत हिर्डोशी यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (ता.१५) हिर्डोशी येथे झालेल्या गणस्तरीय कार्यशाळेत भोरचे प्रभारी गटविकास अधिकारी उदय जाधव यांनी मार्गदर्शन केले.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत राबवले जाणार असून ग्रामपंचायतींनी निकषांनुसार जास्तीत जास्त कामे करून गुण मिळवावे व प्रथम क्रमांक मिळवण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन जाधव यांनी केले. विस्तार अधिकारी अमरजा दंडे, कृषी विस्तार अधिकारी शिवराज पाटील, ग्रामपंचायत अधिकारी अभय निकम यांनी मार्गदर्शन केले. हिर्डोशीचे सरपंच बबन मालुसरे, उपसरपंच दीपक धामुणसे, ग्रामपंचायत सदस्य कोंडिबा धामुणसे, रेश्मा धामुणसे, आरती गोरे, प्रकाश गोरे, सुशीला राजीवडे, रूपाली धामुणसे, कोंढरीचे सरपंच अजित पारठे, आशिंपीचे सरपंच प्रकाश उंब्राटकर, शिळिंबच्या सरपंच हीना डेरे, वरवंडच्या सरपंच तान्हुबाई गोडावळे, ग्रामस्थ अरुण मालुसरे, विठ्ठल धामुणसे, हनुमंत धामुणसे, मारुती धामुणसे, संदीप धामुणसे यांसह आरोग्य विभाग, अंगणवाडवाडी सेविका, आशासेविका ग्रामस्थ उपस्थित होते.