हिर्डोशी, ता.५ : करंजे (ता.भोर) येथील शेतकरी नितीन ज्ञानेश्वर कुडले यांनी सांगवी भिडे येथील गोखले रानातील २३ गुंठे क्षेत्रात लावलेल्या ४५ नारळांच्या रोपांचे रानडूकरांनी शुक्रवारी (ता.३) रात्री नासधूस करून नुकसान केले आहे. वनविभागाकडून नुकसान भरपाई मिळण्याची मागणी शेतकऱ्याने केली आहे.
कुडले यांनी मे महिन्याच्या शेवटी ही झाडे लावली होती. रोप, खड्डा, खत, औषधे बांधणी असा प्रत्येक रोपाला एक हजार रुपये खर्च आला होता. परंतु रानडुक्करांनी ही सर्व रोपे मुळांपासून उकरून रोपांना असलेले नारळ तोडून, फोडून रोपांचे नुकसान केले आहे. शनिवारी शेतकरी फेरफटका मारायला गेले असता झालेले नुकसान दिसून आले. चार महिन्यापूर्वी लावलेली रोपे, केलेली मेहनत वाया गेली असून ४५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसान भरपाईबाबत वनविभागाकडे अर्ज करणार असल्याचे कुडले यांनी सांगितले.
02642