महुडे, ता. १९ : वेळवंड व गायमाळ (ता.भोर) हद्दीत गेल्या पाचसहा दिवसांपासून बिबट्याचे दर्शन घडत आहे. बिबट्याचा वावर वाढल्याच्या वारंवार तक्रारी वन विभागाकडे येत होत्या. त्यामुळे वन विभागाने गावात जाऊन पाहणी करत ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.
जिल्ह्यातील जुन्नर,शिरूर, आंबेगाव तालुक्यात बिबट्याचे मानवावर हल्ले वाढले असतानाच गेले पाच सहा दिवसांपासून वेळवंड परिसरात बिबट्याचा वावर असल्याच्या चर्चेने गावात भीतीदायक वातावरण असल्याने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिकांनी केली. त्यानंतर वनविभागाच्या वेळवंड वनपाल विद्या गेंगजे, वनरक्षक महेश जगताप व नामदेव कोळी यांनी शुक्रवारी रात्री अकरा वाजेपर्यंत वेळवंड व गायमाळ येथे फिरून पाहणी केली. दरम्यान, बिबट विषयी संरक्षण व उपाययोजना, मानव आणि वन्यजीव संघर्ष, निसर्ग साखळी, वन्यजीव संरक्षण आणि पर्यावरण याबाबत वनाधिकारी यांनी मार्गदर्शन केले. वेळवंड परिसरात बिबट्यामुळे भितीचे वातावरण आहे. बिबट्या विषयीच्या उपाययोजनेबाबत राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे ग्रामस्थ सोपान बैलकर यांनी सांगितले.
बिबट्याच्या होणाऱ्या हल्ल्यापासून आपण स्वतः काळजी घेणे गरजेचे असून रात्री अपरात्री एकट्याने बाहेर पडू नये. रात्री अंगणात झोपू नये. बिबट्या दिसल्यावर तातडीने वनविभागाला कळवावे. लहान मुलांनी शाळेत जाताना समुहाने जावे. पाळीव जनावरे बंदिस्त गोठ्यात बांधावीत. बिबट्या दिसल्यास त्याचा पाठलाग न करता एका जागी उभे राहून आरडाओरडा करावा आदी सूचनांचे काटेकोरपणे पालन करा, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले.
02697
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.