पुणे

भोर तालुक्यात रिक्त पदांमुळे उपचारास दिरंगाई

CD

विलास मादगुडे : सकाळ वृत्तसेवा

हिर्डोशी, ता.१८: भोर तालुक्यात पशुसंवर्धन विभागाच्या राज्य पशुसंवर्धन विभाग १४ व जिल्हा परिषदेच्या ११ अशा २५ दवाखान्यांमार्फत पशुधन आरोग्य सेवा पुरवली जाते. परंतु स्थानिक पातळीवर काम करणारी पशुधन पर्यवेक्षक (डॉक्टर) पदांपैकी राज्य स्तरीय मंजूर १४ पैकी ११ पदे तर जिल्हा परिषदेची ११ पैकी २ पदे रिक्त आहेत. त्यामुळे कार्यरत असलेल्या पर्यवेक्षकांवर अतिरिक्त भार पडतो. त्यांना धावपळ करावी लागते. परिणामी पशुधनांवर उपचार करताना दिरंगाई होत आहे.

तालुक्याची भौगोलिक परिस्थिती आणि पशुधनाच्या संख्येच्या मानाने रिक्त पदे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पर्यवेक्षकांना प्रत्येक ठिकाणी पोचणे शक्य होत नसल्याने वेळेवर उपचार मिळत नसल्याने पशुधन मालकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

२०व्या पशुगणनेनुसार पशुधन
२५६८७.......गायवर्ग
१७३६६.......म्हैसवर्ग
८७२६.......शेळी
२८६७.......मेंढी
२४३७.......इतर पशुधन

तालुक्यातील दृष्टिक्षेपातील पशुसेवा
- पशुधनांवर उपचार करण्यासाठी २५ दवाखान्यांचे जाळे
- पर्यवेक्षकांना राज्यस्तरीय दवाखान्यांवरील एक दोन ठिकाणचा अतिरिक्त भार
- रिक्त पदांमुळे पर्यवेक्षकांना फिरते काम जास्त असल्याने दवाखाने राहतात बंद
- लंपी व बोटुलिझम रोगांची नोंद
- औषधसाठा उपलब्ध असून आपत्कालीनसाठी खासगी वाहनांचा वापर
- तीन फिरते दवाखाने (शिरगाव, नसरापूर व भोर )
- ७५ टक्के अनुदानावर ५ दुधाळ जनावरे तर एक शेळीगट वाटप
- महिला बचत गटांना ५.२५ लक्ष वाटप (खाद्य, साहित्य)

लाळ्या खुरकूतचे उपचार
- ३३६४४

बियाणे वाटप
- ४५०० क्विंटल (मका व ज्वारी)


राज्य पशुसंवर्धन विभागातील पदे
पद.......मंजूर.......रिक्त
पशुधन पर्यवेक्षक.......१४.......११
परिचर.......१४...... ८

जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागातील पदे
पशुधन पर्यवेक्षक.......११.......२
परिचर.......१२.......१०


जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग कामकाज (ऑक्टोबरपर्यंत)
काम........उद्दिष्ट.......साध्य झालेले काम........टक्केवारी........मागील वर्षीचे काम
औषधोपचार........४०६१०........१५४४२........३८.३........९९८०
कृत्रिम रेतन........१५५५८........३६६८........२३.७........२२१६
गर्भ तपासणी........७०२३........३१३२........४४.६........१७५५
वंधत्व तपासणी........ ७०७६........११५६........१६.३४........९२४
जन्मलेली वासरे........४४६७........८७६........१९.६१........५७३
खच्चीकरण........८२०........२४९........३०.३७........९१
लसीकरण........१४९११४........६७६६२........४५.३८........४५०७०


- सेवाशुल्क - २२२०३८- ३५६१९२- १६०.४२-१९८८९७

लसीकरण
लाळ खुरकूत........१४९००
लंपी........९०००
ई एन........३९००
एच एस........४६००
रेबीज........९४००
बी क्यू........७००


कृत्रिम रेतन
मार्च २०२४ते मार्च २०२५ अखेर - १९७४
एप्रिल ते ऑक्टोंबर २०२५ अखेर -१२३१


बियाणे वाटप - किलो ग्रॅम मध्ये
- मका - १५०५
- शुगर गेज(ज्वारी)-२८०


पशुधन पर्यवेक्षक रिक्त पदांची संख्या मोठी असल्याने कार्यरत असलेल्या पर्यवेक्षकांवर अतिरिक्त भार दिलेला आह. त्यामार्फत पशुसंवर्धन विभागाचे कामकाज सुरू आहे. रिक्त पदे भरती झाल्यावर कामकाज सुरळीत होईल.
- वर्षाराणी जाधव, पशुधन विकास अधिकारी भोर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Bus Accident Video: पुण्यात बसचा थरार! चालक उतरला अन् बस चालू लागली; चालत्या गाडीतून प्रवाशांच्या उड्या

Asim Sarode: अ‍ॅड. असीम सरोदे यांची सनद रद्द करण्यास ‘बीसीआय’ची स्थगिती; आदेशात नेमकं काय म्हटलं?

Mangalwedha News : नगराध्यक्षपदाच्या तीन अर्जासह नगरसेवकाच्या दोन अर्जावरील निकालाची मंगळवेढेकरांना प्रतीक्षा

Angar Election: राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद का झाला? 'या' होणार बिनविरोध नगराध्यक्ष?

IND W vs BAN W: वर्ल्ड कप जिंकल्यानंतर होणारी भारतीय संघाची मालिका BCCI कडून स्थगित! जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT