पुणे

नारायणगावात कृषी डिजिटल ॲपचे प्रशिक्षण

CD

नारायणगाव, ता. २ : पुणे, सोलापूर, अहिल्यानगर जिल्ह्यातील कृषी विस्तार अधिकारी व कर्मचारी यांना कृषी डिजिटल ॲपच्या वापराबाबतचे मास्टर ट्रेनर प्रशिक्षण येथील कृषी विज्ञान केंद्रात देण्यात आले. या प्रशिक्षणामुळे शेतकऱ्यांना कीड, रोग, हवामान आदींसह इतर कृषी विषयक तांत्रिक माहिती शेतकऱ्यांना देण्यास मदत होणार आहे.
ग्रामोन्नती मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव, महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या वतीने कृषी डिजिटल ॲप प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. कृषी सहसंचालक दत्तात्रेय गवसाने, माजी कृषी संचालक दशरथ तांबळे, मालविका चौधरी, केबीची ॲग्री डिजिटल टूल कॉर्डिनेटर मधू मंजरी, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. दत्तात्रेय गावडे यांनी या प्रशिक्षणात कृषी विस्तारक यांना मार्गदर्शन केले.

कृषी विभागाचे कृषी सहसंचालक दत्तात्रेय गवसाने म्हणाले की, कृषी विस्तार हा कृषी विभागाचा आत्मा आहे. त्यामुळे कृषी विभागातील कृषी विस्तारामधील अधिकाऱ्यांनी एआय तंत्रज्ञान, आयओटी तंत्रज्ञान, कीड रोग प्रेडिक्शन, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान बदल आदि माहिती अवगत करून शेतकऱ्यापर्यंत याचा प्रसार करणे अपेक्षित आहे. त्या दृष्टीने कृषी डिजिटल ॲपच्या वापराबाबतचे मास्टर ट्रेनर प्रशिक्षण देण्यात आले आहे.

06975

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gotya Gitte: वाल्मिक कराड माझे दैवत, धनंजय मुंडेंना बदनाम करु नका, नाहीतर... फरार गोट्या गित्तेची जितेंद्र आव्हाडांना धमकी, व्हिडिओ व्हायरल

PM Narendra Modi : जागतिक अनिश्‍चिततेत राष्ट्रहित जपणार; ‘स्वदेशी’ वापरण्याचे पंतप्रधानांचे आवाहन

Harshwardhan Sapkal : काँग्रेसचा विचार हा पाकिस्तानचे दोन तुकडे करणारा

Rahul Mote : परंडा मतदारसंघांमध्ये पुन्हा वाजणार का? 'घड्याळाची ठकठक' घड्याळ तेच वेळ नवी!

MP Nilesh Lanke : अहिल्यानगर शहर पोलिस प्रशासनावर राजकीय दबाव; खासदार नीलेश लंके यांचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT