पुणे

केळी क्लस्टरचे स्वप्न साकारू : मेहेर

CD

नारायणगाव, ता. ४ : दिशा कृषी उन्नती २०२९ हे अभियान जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या पुढाकाराने व महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत सुरू झाले आहे. शेतकरी उन्नत होण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करून कमी खर्चात केळीचे निर्यातक्षम उत्पादन घेणे आवश्यक आहे. निर्यात व मूल्यवर्धनाद्वारे आधिकचा नफा शेतकऱ्यांना देण्याचे नियोजन आहे. सामूहिक प्रयत्नाने केळी क्लस्टरचे स्वप्न साकार करू, असा विश्वास कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष, कृषिरत्न अनिल मेहेर यांनी व्यक्त केला.

नारायणगाव (ता. जुन्नर) येथे प्रकल्प संचालक आत्मा, पुणे, महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या वतीने कृषी विज्ञान केंद्र निर्यातक्षम उत्पादनासाठी केळी पीक मास्टर ट्रेनर प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले होते. या वेळी कृषिरत्न मेहेर, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रशांत शेटे, शास्त्रज्ञ भरत टेमकर, डॉ. दत्तात्रेय गावडे, डॉ.योगेश यादव तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले (जुन्नर), सिध्देश ढवळे (आंबेगाव) सुवर्णा आदक (शिरूर), प्रमोद बनकर (खेड), तुषार जाधव, सुयोग खोसे यांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील केळीचे स्थान व निर्यात, केळी उत्पादन वाढीची तंत्रे, केळी पिकावरील कीड व रोग व्यवस्थापन, ए.आय. तंत्रज्ञानाचा केळी पिकामध्ये वापर,के ळी पिकातील एकात्मिक खत व्यवस्थापन, केळी पिकासाठी कृषी विभागातील योजना या संदर्भात जुन्नर, आंबेगाव, खेड,शिरूर तालुक्यातील केळी उत्पादकांना मार्गदर्शन केले.
यावेळी डेक्कन व्हॅली फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचे अध्यक्ष अजय बेल्हेकर, कृषी बाजार समिती जुन्नर चे संचालक माऊली खंडागळे, अखिल भाजीपाला उत्पादक संघाचे अध्यक्ष श्रीराम गाढवे,विनायक मुळे यांनी मनोगत व्यक्त केले.

06993

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली; राज्यात पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

प्रवाशांची होणार कोंडी! रेल्वेनंतर वाहतूक विभागाचा ब्लॉक; खड्डे समस्यांसाठी 'या' मार्गावर ३ दिवस प्रवेश बंद

Elephant Relocation Controversy : कोल्हापूर झालं आता गडचिरोलीचा नंबर? 'माधुरी'नंतर कमलापूर कॅम्पमधील हत्तींबाबत चिंतेचं वातावरण...

ENG vs IND: 'वॉन आणि माझ्यात ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्याच्या बातम्या निराधार...' कसोटी मालिकेनंतर वासिम जाफरची पोस्ट चर्चेत

Latest Maharashtra News Updates Live : जिल्हा परिषदेच्या चार हजार ८० जागांच्या भरतीचा मार्ग मोकळा

SCROLL FOR NEXT