पुणे

शाश्‍वत उत्पादनासाठी नारळ लागवडीचा विचार करा

CD

नारायणगाव, ता. ४ : ‘‘परवानाधारक रोपवाटिकेमधून नारळाची किमान २० रोपे खरेदी करून लागवड केल्यास प्रतिरोप ३५० रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना दिले जाईल. नारळ बहुउपयोगी असल्याने शाश्वत उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी नारळ लागवडीचा विचार करावा, ’’असे मत ठाणे येथील नारळ विकास बोर्डाचे उपसंचालक बी. चिन्नाराज यांनी व्यक्त केले.


कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव, नारळ विकास बोर्ड, ठाणे यांच्या वतीने जागतिक नारळ दिनानिमित्त एकदिवसीय कार्यशाळेचे नुकतेच आयोजन केले होते. कार्यशाळेत नारळ लागवडीचे तंत्रज्ञान, विविध शासकीय अनुदान योजना, आणि प्रक्रिया उद्योगांची माहिती कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष कृषिरत्न अनिल मेहेर, पुणेचे विभागीय कृषी सहसंचालक दत्तात्रेय गावसाने, नारळ विकास बोर्डाचे उपसंचालक बी. चिन्नाराज, शास्त्रज्ञ भरत टेमकर, डॉ. दत्तात्रेय गावडे यांनी शेतकऱ्यांना दिली. या वेळी
नारळ लागवड तज्ज्ञ रवींद्र कुमार, तंत्र अधिकारी विपीन पी., प्रक्षेत्र अधिकारी शैलेंद्र खिलारी, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. प्रशांत शेटे, राहुल घाडगे, कृषी अधिकारी प्रमोद बनकर, तालुका कृषी अधिकारी सिध्देश ढवळे, सुवर्णा आदक, जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.
कृषिरत्न मेहेर म्हणाले की, हवामान बदलांना आणि किडी-रोगांना प्रतिकारक्षम असणाऱ्या नारळाच्या जातींची निवड करणे महत्त्वाचे आहे. नारळ लागवड करताना आंतरपीक पद्धतीचा वापर करावा. कृषी विज्ञान केंद्र नारळ विकास बोर्डाकडून सुधारित जातींची रोपे उपलब्ध करून देईल. अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करील.
कृषिविस्तार शास्त्रज्ञ राहुल घाडगे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. दत्तात्रेय गावडे यांनी आभार मानले.

नारळ विकास बोर्डाने मागील तीस वर्षात २० लाख हेक्टर क्षेत्रात नारळाची लागवड वाढविली आहे. यामुळे वीस शेतकऱ्यांच्या गटाला सात दिवसांचे मोफत निवासी प्रशिक्षणही दिले जाते. त्यासोबत नारळ काढण्याचे यंत्र आणि पाच लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाते.
- बी. चिन्नाराज, उपसंचालक, नारळ विकास बोर्ड


07109

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Doctor Case : साताऱ्यात महिला डॉक्टरने शारीरिक अत्याचाराला कंटाळून जीव दिला! तिच्यावर दबाव टाकणारा 'तो' खासदार कोण?

AUS vs IND: विराट -रोहितची फक्त फलंदाजीमध्येच नाही, तर फिल्डिंगमध्येही हवा; २-२ कॅच घेत केले मोठे विक्रम

Pune News : केंद्रीय मंत्री मोहोळ यांची जैन बोर्डिंगला भेट; जैन मुनींपुढे नतमस्तक

कसं गणित जुळवायचं? १० एकरात फक्त १२ क्विंटल सोयाबीन, नापिकी अन् कर्जबाजरीपणाला कंटाळून शेतकऱ्याने संपवलं जीवन

Crime: पत्नी निघून गेली; नराधम बापानं १४ वर्षीय लेकीला वासनेचं बळी केलं अन्...; २ महिन्यांनी जे घडलं त्यानं सारेच हादरले

SCROLL FOR NEXT