पुणे

पिंपळगावतर्फे नारायणगाव, गुंजाळवाडी हॉटस्पॉट

CD

नारायणगाव, ता. ११ : वनविभागाच्या वतीने पिंपळगावतर्फे नारायणगाव येथे लावलेल्या पिंजऱ्यात सुमारे दोन वर्षे वयाचा मादी बिबट्या गुरुवारी (ता.११) पहाटे जेरबंद झाला. मागील दोन महिन्यात या भागात जेरबंद झालेला हा चौथा मादी बिबट्या आहे. या भागात अजून दोन बिबट्यांचा संचार असून त्यांना जेरबंद करण्यासाठी पुन्हा पिंजरा लावावा, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.
मीना नदी काठावर वसलेला पिंपळगावतर्फे नारायणगाव, गुंजाळवाडी, आर्वी परिसर बिबट्यांसाठी हॉटस्पॉट ठरत आहे. बिबट्यांच्या हल्ल्यामध्ये या भागात पाळीव जनावरे व कुत्रे ठार झाले आहेत. नारायणगाव वनपरिक्षेत्रातील पिंपळगाव तर्फे नारायणगाव, नारायणगाव, वारूळवाडी, मांजरवाडी, चिमणवाडी, आर्वी, गुंजाळवाडी परिसरात बिबट्यांची संख्या वाढली आहे. शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार पिंपळगावतर्फे नारायणगाव परिसरातील वाणीमाळा शिवारात वनविभागाने १५ जुलै ते ४ ऑगस्ट दरम्यान लावलेल्या पिंजऱ्यात पूर्ण वाढ झालेले तीन मादी बिबटे जेरबंद झाले होते. येथे रात्रीच्या वेळी बिबट्यांचा आवाज येत आहे. या भागात नर बिबटे असण्याची शक्यता आहे. यामुळे पुन्हा चौथा पिंजरा लावावा, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली होती.
उपवनसंरक्षक प्रशांत खाडे, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल अनिता होले, वनरक्षक ज्ञानेश्वर पवार, वनरक्षक बनसोडे, मास्टर ट्रेनर सुशांत भुजबळ यांनी सकाळी मादी बिबट्याला माणिकडोह येथील निवारा केंद्रात सोडण्यात आले. मादी बिबट अतिशय आक्रमक असल्याने पिंजरा वाहनामध्ये टाकण्यासाठी स्थानिक महेश चव्हाण, चंद्रकांत चव्हाण, रवींद्र चकवे, रोहिदास वऱ्हाडी, उत्तम वऱ्हाडी, गणेश वऱ्हाडी यांनी सहकार्य केले.

07146

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump Special Envoy Sergio Gor: ट्रम्प यांचे विशेष दूत सर्जियो गोर यांचं मोठं विधान म्हणाले, ''भारत आमचा धोरणात्मक भागीदार अन्... ''

IND vs WI Test Series: केएल राहुलकडे कसोटी संघाचे नेतृत्व, श्रेयस अय्यरचे पुनरागमन; वेस्ट इंडिजविरुद्ध अशी असेल टीम इंडिया

Modem Balakrishna : कोण होता मॉडेम बालकृष्ण? तब्बल एक कोटींचा होता इनाम, खात्मा झाल्याने नक्षलवाद्यांना मोठा झटका

Pune News : तीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या सावत्र बापाला मरेपर्यंत जन्मठेप

Nepal Protests : नेपाळमधील आंदोलनानंतर विमानसेवा सुरू, पर्यटकांचा मायदेशी परतीचा प्रवास

SCROLL FOR NEXT