नारायणगाव, ता. १७ : येथील लाला अर्बन बँकेला ‘महाराष्ट्र अर्बन को- ऑप. बँक्स फेडरेशन’चा सन २०२४- २०२५ या आर्थिक वर्षासाठीचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार, तृतीय क्रमांकासाठी मिळाला आहे.
नाशिक येथे झालेल्या पुरस्कार वितरण समारंभात नॅशनल अर्बन को ऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे अध्यक्ष ज्योतींद्र मेहता, विधान परिषदेचे भाजपचे गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांच्या हस्ते लाला बँकेचे अध्यक्ष युवराज बाणखेले, उपाध्यक्ष जितेंद्र गुंजाळ, ज्येष्ठ संचालक अशोक गांधी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
यावेळी व्यवस्थापकीय मंडळाचे अध्यक्ष जैन्नुदद्दीन मुल्ला, संचालक ॲड. निवृत्ती काळे, रामदास बाणखेले, नितीन लोणारी, मंगेश बाणखेले, नारायण गाढवे, जयसिंग थोरात, संदीप लेंडे, डॉ. सचिन कांबळे, सुनीता साकोरे, इंदुमती कवडे, बाळासाहेब शिंदे, भानुदास टेंगले, तज्ञ संचालक किरण कर्नाड, ॲड. शंकर शेवाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी डी. एन. सुरम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप मोरे, कर्ज अधिकारी प्रमोद कांबळे, वसुली अधिकारी संतोष पटाडे, गुंतवणुक अधिकारी मनोहर गभाले उपस्थित होते.
लाला बँकेने ५२व्या वर्षात पदार्पण केले आहे. सन २०२४ २५ या आर्थिक वर्षात बँकेच्या ठेवीत ६८ कोटी रुपयांची, तर कर्ज वाटपामध्ये ४० कोटी रुपयांची वाढ झाली आहे. आर्थिक शिस्तीमुळे बँकेला ऑडिट वर्ग ‘अ’ मिळाला आहे. बँकेकडे ५३२ कोटी रुपयांच्या ठेवी असून, ३५२ कोटी रुपयांचे कर्जवाटप केले आहे. चौदा शाखांसह बँकेचा मिश्र व्यवसाय ८८४ कोटी रुपयांचा आहे. मागील वर्षी बँकेला कै. वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.
- युवराज बाणखेले, अध्यक्ष, लाला अर्बन बँक
07174