पुणे

वारूळवाडी परिसरात ‘एआय’ची बिबट्यावर नजर

CD

नारायणगाव, ता. ५ : बिबट प्रवण क्षेत्र असलेल्या वारूळवाडी येथे जुन्नर वन विभागाच्या वतीने कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय )आधारित स्वयंचलित, इंटरनेट शिवाय काम करणारी एज-कॉम्प्युटिंग बिबट्या शोध प्रणाली बसवण्यात आली आहे. ही प्रणाली ३५ मीटर अंतरापर्यंतच्या शेतीजवळील बिबट्यांच्या हालचाली अचूकपणे ओळखून त्याचे छायाचित्र घेऊन त्याची प्रतिमा सेव्ह करते. बिबट्या दिसताच सायरन वाजतो.
सायरनच्या ध्वनीचा आवाज जेट विमाना एवढा म्हणजेच १.२० डेसिबल इतका असतो. यामुळे स्थानिक नागरिक, शेतकरी,वन विभाग तत्काळ सतर्क होतो. यामुळे बिबट्यांपासूनचा संभाव्य धोका टाळण्यास मदत होत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ही एक अत्याधुनिक उपाययोजना आहे. या प्रणालीत मिनी कॉम्प्युटरचा वापर केला असून स्वयंचलित कॅमेर्याद्वारे आणि तंत्र ज्ञानाद्वारे ही यंत्रणा काम करते. या प्रणालीसाठी अत्याधुनिक नविडिया जीपीयु (NVIDIA GPU) आधारित मिनी संगणक वापरण्यात आला असून इंटरनेटविरहित एज-कंप्यूटिंगद्वारे थेट कॅमेऱ्यांमधील व्हिडिओ डेटा प्रक्रिया करून त्वरित निर्णय घेतला जातो.अशी माहिती वनरक्षक ज्ञानेश्वर पवार यांनी दिली.

या प्रणालीतील प्रमुख घटक व त्यांचे कार्यः
१. एआय व्हीजन अल्गोरिदम
बिबट्याच्या हालचाली अचूकपणे ओळखणारे अत्याधुनिक तंत्रज्ञान
मशिन लर्निंग मॉडेलचा वापर करून ओळख आणि सतर्कता प्रणाली
२. नविडिया जीपीयु आधारित मिनी संगणक :
एज-कंप्युटिंगसाठी उच्च-क्षमता संगणक
एज-कॉम्प्युटिंग मुळे इंटरनेटविरहित प्रत्यक्ष व्हिडिओ डेटा प्रक्रिया करून त्वरित ओळख आणि सतर्कता
३. एआय कॅमेरे :
वाड्या, वस्त्या, शेतीजवळील परिसराचे २४ तास निरीक्षण
दिवसा स्पष्ट प्रतिमा आणि हॅलोजन लाइटच्या मदतीने रात्री देखील स्पष्ट दृश्याची क्षमता
४. इंटरनेटविरहित स्मार्ट अलार्म यंत्रणा :
बिबट्या आढळल्यास १२० डेसिबल क्षमतेच्या सायरनद्वारे नागरिकांना सतर्क करणे.
संभाव्य मानव-बिबट्या संघर्ष टाळण्यासाठी त्वरित उपाय

५. क्लाऊड-आधारित ॲप :
बिबट्यांच्या हालचालींचा डेटा गोळा करून विश्लेषण करणे
हॉटस्पॉट्स ट्रॅकिंग व भविष्यातील संभाव्य धोक्यांची पूर्वसूचना

सिम्युसॉफ्ट टेक्नॉलॉजीज, पुणे यांनी विकसित केलेली ही एआयवर आधारित एज-कॉम्प्युटिंग प्रणाली वन्यजीव आणि मानव यांच्या सहअस्तित्वासाठी व सुरक्षेसाठी एक महत्त्वपूर्ण तंत्रज्ञानात्मक पाऊल ठरत आहे. या प्रणालीच्या मदतीने वन विभागासह स्थानिक नागरिक, शेतकरी पाळीव जनावरे यांच्या सुरक्षेला हातभार लागणार आहे. भविष्यात, स्वस्त आणि प्रभावी हार्डवेअर सुधारणांसह ही प्रणाली अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न आहे.
- सुनील चोरे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, सिम्युसॉफ्ट टेक्नॉलॉजीज, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs PAK W: भारतीय रणरागिणींनीही पाकिस्तानला दाखवला इंगा, वर्ल्ड कप सामन्यात चारली पराभवाची धूळ

IND A vs AUS A: प्रभसिमरनचं वादळी शतक, तर श्रेयस अय्यर-रियान परागचीही फिफ्टी! भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकली ODI सिरीज

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

Crime: पक्षातील सदस्याला अडकवण्यासाठी घरात स्फोटके आणि दारू ठेवली, पण काँग्रेस नेता स्वत:च अडकला अन्...; काय घडलं?

दुर्दैवी घटना! 'सख्ख्या काकाच्या पिकअपखाली सापडून चिमुरड्याचा मृत्यू'; आंबेगाव तालुक्यातील घटना, कुटुंबीयांचा आक्रोश

SCROLL FOR NEXT