पुणे

जुन्नर बाजार समितीची जागा खरेदी रद्द करणार

CD

नारायणगाव, ता. ९ : ‘‘नारायणगाव (ता. जुन्नर) उपबाजार आवाराचा विस्तार करण्यासाठी गायरान जागा उपलब्ध असताना जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीने कोट्यवधी रुपये खर्च करून जागा खरेदी करण्याची गरज नव्हती. या व्यवहारात आर्थिक गैरव्यवहार झाला आहे. शेतजमीन खरेदीचा व्यवहार कोणत्याही परिस्थितीत रद्द केला जाईल,’’ असा इशारा आमदार शरद सोनवणे यांनी दिला.
जुन्नर बाजार समितीच्या वतीने नारायणगाव उपबाजार आवारासाठी वारूळवाडी ग्रामपंचायत हद्दीत वळणवाडीजवळ राज्य महामार्गालगत दहा एकर जागा नुकतीच खरेदी केली. या व्यवहारात गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप आमदार सोनवणे, बाजार समितीचे संचालक माउली खंडागळे यांनी केला आहे. हा व्यवहार रद्द व्हावा, या मागणीसाठी खंडागळे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (ता. ९) दुपारी नारायणगाव बसस्थानक ते टोमॅटो बाजार आवार दरम्यान मोर्चा काढण्यात आला होता. उपबाजार आवारात झालेल्या सभेत आमदार सोनवणे बोलत होते. या वेळी शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष देविदास दरेकर, उपसरपंच योगेश पाटे, सचिन वाळुंज, रघुनाथ लेंडे, तानाजी तांबे, बाजार समितीचे संचालक संतोष चव्हाण, भास्कर गाडगे, मेघा काकडे, पंचायत समितीच्या माजी सभापती संगीता वाघ आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार सोनवणे यांनी पणन संचालक व सहाय्यक निबंधक यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले. तसेच, मागण्यांचे निवेदन तहसीलदार डॉ. सुनील शेळके यांना दिले. संतोष चव्हाण यांनी आभार मानले.

उपबाजार आवाराचा विस्तार करण्यासाठी जागा खरेदी करायची असेल तर त्यासाठी प्रस्ताव लोकप्रतिनिधी व जिल्हाधिकाऱ्यांना पाठवावा लागतो. असा कोणताही प्रस्ताव न पाठवता दहा एकर जागा खरेदी केली आहे. उपबाजार आवारासाठी खानापूर, येडगाव, हिवरेतर्फे नारायणगाव, वारूळवाडी या ठिकाणी गायरान जागा उपलब्ध आहे. असे असताना जागा खरेदी करण्याची गरज नव्हती.
- शरद सोनवणे, आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Congratulates Trump : मोठी बातमी! पंतप्रधान मोदींकडून ट्रम्प यांचे अभिनंदन अन् ट्रेड डीलवरही झाली चर्चा

Mumbai Metro: पहिल्याच दिवशी ‘मेट्रो ३’मधून लाखो प्रवाशांचा प्रवास, पण समस्यांचा पाढा वाचला, वाचा सविस्तर...

INDW vs SAW: पोरीनं काय भारी कॅच घेतलाय! भारताच्या क्रांतीने पकडला वर्ल्ड कपमधील सर्वोत्तम झेल; पाहा Video

Government Decision: कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय! महिलांना मिळणार मासिक पाळी रजा, सर्व क्षेत्रातील महिलांसाठी लागू

Varinder Singh Ghuman death : धक्कादायक! जगातील पहिला शाकाहारी ‘प्रोफेशनल बॉडीबिल्डर‘ वरिंदर सिंह घुमनचा ‘हार्ट अटॅक’ने मृत्यू

SCROLL FOR NEXT