पुणे

जुन्नर तालुक्यात द्राक्ष बागांवर कुऱ्हाड

CD

रवींद्र पाटे: सकाळ वृत्तसेवा
नारायणगाव, ता. २ : मागील सहा महिन्यापासून सुरू असलेला पाऊस, अतिवृष्टी, ढगाळ वातावरण याचा फटका जुन्नर तालुक्यातील खरीप पिकांसह भाजीपाला पिके व टोमॅटो, द्राक्ष या नगदी पिकांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. पिकांच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.
निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात अग्रेसर असलेल्या जुन्नर तालुक्यातील सुमारे ८० टक्के द्राक्ष बागांना फळ छाटणीनंतर घड निर्मिती न झाल्याने मागील ४० वर्षात प्रथमच द्राक्षशेती धोक्यात आली आहे. तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांना सुमारे २०० कोटी रुपयांचा फटका बसणार आहे. सलग दुसऱ्या वर्षी घड निर्मिती न झाल्याने मागील पाच दिवसात शेतकऱ्यांनी सुमारे २० एकर क्षेत्रातील द्राक्ष बागांवर कुऱ्हाड चालवली आहे. बहुतेक द्राक्ष उत्पादक जम्बो जातीच्या द्राक्ष बागा तोडण्याच्या मानसिकतेत आहेत. असे असताना पतसंस्था, बँकांनी थकीत कर्ज वसुलीचा, निविष्ठा विक्रेत्यांनी उधारी देण्याचा, तर उधारीवर घेतलेले पैसे देण्याचा नातेवाईक, मित्रमंडळीनी तगादा लावला आहे. एकूणच शेतकरी आर्थिक अडचणी सापडला आहे
तालुक्यात मे महिन्यात सुरू झालेला पाऊस अजूनही थांबण्याचे नाव घेत नाही. तालुक्यात ७५० ते ८०० मिलिमीटर पाऊस झाला आहे. एप्रिल महिन्यात द्राक्ष बागांची खरड छाटणी झाल्यानंतर मे व त्यानंतर सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी झाल्याने सुमारे ८० टक्के द्राक्ष वेलीवर घड निर्मिती न झाल्याने द्राक्ष उत्पादकांवर मोठे संकट कोसळले आहे. कृषी विभागाने नुकसानीचे पंचनामे केले असून, नुकसानीचा अहवाल शासनाला सादर केला आहे.

पंचनामा अहवालाबाबत नाराजी
तालुक्यात सोयाबीन, भात, कडधान्य, भुईमूग, बाजरी, मका आदी खरीप पिकाखाली ५८ हजार हेक्टर, द्राक्ष पिकाखाली सुमारे तीन हजार एकर, टोमॅटो पिकाखाली सुमारे साडे तीन हजार एकर, इतर भाजीपाला पिके, केळी, पेरू या फळ पिकाखाली सुमारे पाच हजार एकर क्षेत्र आहे. सततचा पाऊस व अतिवृष्टी याचा परिणाम सर्वच पिकांवर झाला आहे. यामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे. असे असताना शासकीय निकषानुसार केलेल्या पंचनामा अहवालात फक्त तीन हजार ४११ हेक्टर क्षेत्रातील भात, तृणधान्य, भाजीपाला पिके, सोयाबीन, पेरू, केळी व द्राक्ष या पिकांचे नुकसान झाले असल्याचे नमूद केले आहे. यामुळे खरीप पिकाखालील असलेले एकूण क्षेत्र व शासकीय निकषानुसार पंचनामा अहवालात नमूद केलेले नुकसानग्रस्त क्षेत्र यामध्ये मोठी तफावत दिसून येत आहे. त्यामुळे पंचनामा अहवाला बाबत शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

द्राक्ष पीक हे अन्य फळबागांपेक्षा खर्चिक पीक आहे. लागवडीपासून ते उत्पादनापर्यंत द्राक्ष बागेला एकरी नऊ लाख रुपये खर्च होतो. देशाला परकीय चलन मिळवून देणाऱ्या द्राक्ष बागा वाचवण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने एकरी ६० हजार रुपयांचे अनुदान द्यावे. नुकसानीचे व भरपाईचे स्वतंत्र निकष तयार करावेत.
- संदीप वारुळे, संचालक, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ

वायकर यांच्या २९ एकर, बारवे यांच्या नऊ एकर, रोहन पाटे यांच्या सात एकर द्राक्ष बागेला घड निर्मिती झाली नाही. यामुळे वार्षिक
हंगाम वाया गेल्याने या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे अनुक्रमे २ कोटी, ७० लाख, ५० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
- श्रीकांत वायकर/अवधूत बारवे/ रोहन पाटे, द्राक्ष उत्पादक

पिकांच्या नुकसानीचे पंचनामे केले आहेत. पंचनामा अहवालानुसार तालुक्यातील एकूण ३ हजार ४११ हेक्टर क्षेत्रातील द्राक्ष या प्रमुख पिकासह इतर खरीप पिकांचे एकूण ४ कोटी ५१ लाख ९१ हजार ६०० रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचा अहवाल शासनाला सादर केला आहे.
- गणेश भोसले, तालुका कृषी अधिकारी

एकूण बाधित क्षेत्र (कंसात पंचनामा अहवालात नमूद केलेले नुकसानग्रस्त एकूण क्षेत्र)
भात- १० हजार हेक्टर (७५३.३५ हेक्टर)
सोयाबीन- ९ हजार हेक्टर (एक हजार ४१५ हेक्टर)
मका- २ हजार हेक्टर(५ हेक्टर)
फूल पिके- १ हजार एकर (२० एकर)
द्राक्ष- ३ हजार एकर (दोन हजार ७९० एकर)
टोमॅटो- ३ हजार ५०० एकर (१२.५ एकर)
केळी- ७०० हेक्टर (३.३ हेक्टर)

सप्टेंबर २०२५ मदत (३३ टक्क्यापेक्षा जास्त नुकसान)
पिकांचा प्रकार बाधित शेतकऱ्यांची संख्या एकूण बाधित क्षेत्र हे. अनुदान रक्कम रुपये
जिरायत पिके : ३९८८, २२३०.३५, १ कोटी ८९ लाख ५७ हजार ९७५ रुपये
बागायत भाजीपाला पिके : १४५, ६१, १० लाख ३७ हजार
फळ पिक (केळी, पेरू) : ७, ३.६०, ८१ हजार रुपये
द्राक्ष पिक : १३६६, १११६.२५, २ कोटी ५१ लाख १५ हजार ६२५ रुपये
एकूण शेतकरी - ५५०६, एकूण बाधित क्षेत्र- ३ हजार ४११ हेक्टर, एकूण अनुदान रक्कम- ४ कोटी ५१ लाख ९१ हजार ६००

07413

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Train food vendor beat passenger Video : ‘’जेवण फार महाग आहे’’, एवढंच म्हटलं तर प्रवाशाला रेल्वेतच विक्रेत्यांनी पट्टा काढून बेदम मारलं!

Rafiq Sheikh: रविंद्र धंगेकराच्या आरोपांवर थेट प्रत्युत्तर; रफिक शेख कोण? संपूर्ण माहिती आली समोर

INDIA A SQUAD FOR ODI SERIES vs SOUTH AFRICA A : रोहित शर्मा, विराट कोहली यांचा वन डे संघात समावेश नाही; तिलक वर्माकडे नेतृत्व, तर ऋतुराज उप कर्णधार...

Mhada Lottery: पुण्यात ९० लाखांचे घर फक्त २८ लाखांत मिळणार! म्हाडाची मोठी घोषणा; अर्ज कधी आणि कसा करायचा?

Jalgaon News : जळगावकरांची प्रतीक्षा वाढली; अवकाळी पावसामुळे ई-बस आगाराचे काम रखडले, नवीन वर्षातच बससेवा सुरू होणार

SCROLL FOR NEXT