पुणे

नारायणगावात बळीराजासाठी ‘ग्लोबल’ मंच

CD

नारायणगाव, ता. २६ : आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर करून ५० एकर प्रक्षेत्रावर १०५ पेक्षा जास्त वाणांची शास्त्रोक्त पद्धतीने लागवड केलेली पीक प्रात्यक्षिके, पॉलिहाऊस, शेतकऱ्यांसाठी देश विदेशातील आधुनिक तंत्रज्ञान, १० मिनिटांत माती परीक्षण, आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग, महिला बचत गटांची उत्पादने, धान्य महोत्सव, पशू व कुक्कुट पालन,कृषी प्रदर्शन, कृषी शास्त्रज्ञांशी थेट संवाद आदी माहितीद्वारे बळीराजाला खऱ्या अर्थाने ग्लोबल करणारे ‘ग्लोबल कृषी महोत्सव २०२६’ गुरुवार (ता. ८) व रविवार (ता. ११ जानेवारी २०२६) दरम्यान नारायणगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर आयोजित केले आहे, अशी माहिती कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष कृषिरत्न अनिल मेहेर यांनी दिली.
कृषी प्रदर्शनाच्या महामंडपाचे भूमिपूजन (ता. २६) सकाळी ग्रामोन्नती मंडळाचे विश्वस्त प्रकाश पाटे, अध्यक्ष सुजित खैरे, अध्यक्ष अनिल मेहेर, कार्यवाह रवींद्र पारगावकर यांच्या हस्ते झाले.
यावेळी ग्रामोन्नती मंडळाच्या विश्वस्त मोनिका मेहेर, उपाध्यक्ष शशिकांत वाजगे, उपकार्याध्यक्ष डॉ. आनंद कुलकर्णी, संचालक आल्हाद खैरे, सोमजीभाई पटेल, डॉ. संदीप डोळे, ऋषिकेश मेहेर, अरविंद मेहेर, रत्नदीप भरवीरकर, देवेंद्र बनकर, नीलेश पाटे, केव्हीचे प्रमुख डॉ. प्रशांत शेटे, शास्त्रज्ञ डॉ. राहुल घाडगे, योगेश यादव, भरत टेमकर, डॉ. दत्तात्रेय गावडे, निवेदिता शेटे, डॉ. सुयोग खोसे, वैभव शिंदे, धनेश पडवळ, रूपेश कोळेकर, नितीन होनराव, संतोष पऱ्हाड आदी उपस्थित होते.
कृषी प्रदर्शनाचे उद्‌घाटन गुरुवारी (ता. ८ जानेवारी) सकाळी दहा वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, अपर मुख्य सचिव (कृषी) विकास रस्तोगी (भा.प्र.से), कृषी आयुक्त सूरज मांढरे (भा.प्र.से), जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील (भा.प्र.से), आयसीएआर अटारी पुणे संचालक डॉ. एस. के. रॉय यांच्या उपस्थितीत होणार आहे. समारोप रविवारी (ता. ११ जानेवारी) दुपारी दोन वाजता खासदार सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे, माजी मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थित होणार आहे.

प्रदर्शनाची ठळक वैशिष्ट्ये :
५० एकर क्षेत्रावर शिवार फेरी
शास्त्रोक्त पद्धतीने लागवड केलेली राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांची ५५ पेक्षा अधिक पीक प्रात्यक्षिके
नैसर्गिक शेतीचे पंचसूत्री आणि विविध भाजीपाला पिकांची लागवड
१० गुंठ्यांतील परसबागेतील ४० प्रकारची विषमुक्त भाजीपाला

उद्यानात १२ प्रकारच्या मिलेट प्रकार
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय २५० पेक्षा अधिक कंपन्यांचा सहभाग
नवीन खते, औषधे, बियाणे, यंत्रे, अवजारे, उपकरणे
करार शेती, शेतमाल विक्री, एफपीओ व स्वयंसेवी संस्थांचा सहभाग
शेळी कुक्कुटपालन व कृषी पूरक व्यवसाय
मूल्यवर्धन, प्रक्रिया उद्योग, उत्पादन ते विक्री साखळी, धान्य महोत्सव
शेतीमध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा (AI) वापर
मधमाशी पालन, मशरूम उत्पादन, रेशीम उद्योग
कृषी यांत्रिकीकरण, विविध अवजारे व ड्रोनद्वारे फवारणी प्रात्यक्षिके

7646

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Natural Gas: स्वच्छ इंधनाच्या दिशेने मोठे पाऊल! घरगुती गॅस स्वस्त होणार; देशभरात गॅस पाइपलाइन नेटवर्कचा झपाट्याने विस्तार

Kannad Election Deposit : कन्नड नगरपरिषद निवडणूक; ३० उमेदवारांचे डिपॉझिट जप्त; नगराध्यक्षासह अपक्षाचा फटका!

Mumbai Local: मुंबईकरांनो लक्ष द्या! शनिवारी ३०० लोकल रद्द; १८ जानेवारीपर्यंतचा ब्लॉक कसा असेल?

Wai Crime : वृद्ध महिलेला मारहाण करून दोन लाखांचे सोन्याचे दागिने लंपास; वाई‑पसरणी परिसरात खळबळ!

Mohol News : मोहोळ परिसरात होणाऱ्या अपघातांना जबाबदार कोण; वाहन चालवणाऱ्याची बेदरकारी की पालकांचं दुर्लक्ष!

SCROLL FOR NEXT