पुणे

सोयाबीन उत्पादकांची ‘नाफेड’ केंद्राकडे पाठ

CD

नारायणगाव, ता. ६ : शासकीय हमीभाव खरेदी योजना २०२५-२६ अंतर्गत महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने नारायणगाव (ता. जुन्नर) येथील उपबाजारात २९ नोव्हेंबर २०२५ रोजी सोयाबीन खरेदीसाठी नाफेड हमीभाव केंद्र सुरू केले. ५३ रुपये २८ पैसे प्रतिकिले या दराने सोयाबीनची खरेदी सुरू केली. मात्र, सद्यःस्थितीत सोयाबीनच्या बाजारभावात वाढ झाल्याने सोयाबीन विक्रीसाठी येथील नाफेड हमीभाव केंद्राकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे.
नोव्हेंबर महिन्यात खासगी व्यापाऱ्यांकडून सोयाबीनची खरेदी प्रतवारीनुसार प्रतिकिलो ३५ ते ४५ रुपये या भावाने केली जात होती. सोयाबीनला हमीभाव मिळावा, या उद्देशाने बाजार समितीने नारायणगाव उपबाजारात २९ नोव्हेंबर २०२५ रोजी नाफेड हमीभाव केंद्र सुरू केले. त्यामुळे सोयाबीनला प्रतिकिलो ५३ रुपये २८ पैसे, असा भाव मिळाला. हमीभाव केंद्रामुळे सोयाबीनला प्रतिकिलो सुमारे दहा रुपये जास्त बाजारभाव मिळाल्याने मागील दोन महिने येथील केंद्रात सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. १५ फेब्रुवारी २०२६पर्यंत खरेदी केंद्र सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने सचिव रुपेश कवडे, उपसचिव शरद घोंगडे यांनी दिली आहे. मात्र, सद्यःस्थितीत सोयाबीनच्या बाजारभावात वाढ झाली आहे. खासगी व्यापारी सोयाबीनची खरेदी प्रतवारीनुसार प्रतिकिलो ५५ ते ५७ रुपये बाजारभावाने करत आहेत. त्यामुळे नाफेड हमीभाव केंद्रापेक्षा खासगी व्यापाऱ्यांकडून सोयाबीनला जास्त भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी येथील सोयाबीन नाफेड हमीभाव केंद्राकडे पाठ फिरवली आहे.

नारायणगाव उपबाजारातील नाफेड हमीभाव केंद्रात मागील दोन महिन्यात ५३४.२५ टन (१० हजार ६८५ गोणी) सोयाबीनची खरेदी झाली आहे. सोयाबीन खरेदीतून २ कोटी ८४ लाख ६ हजार ४८४ रुपयांची उलाढाल झाली आहे. मात्र, सद्यःस्थितीत नाफेड हमीभाव केंद्राच्या बाजारभावाच्या तुलनेत सोयाबीनच्या बाजारभावात वाढ झाली आहे. त्यामुळे सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांचा कल खासगी व्यापाऱ्यांकडे वाढला आहे.
- संजय काळे, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, जुन्नर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: जीआर आला! लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी; आता 'अशी' चूक पुन्हा करु नका

"माझ्या पाठीवरून हात फिरवायचे.." जुळून येति फेम अभिनेत्रीला कलाकाराचा चुकीचा स्पर्श ; "मी सगळ्यांसमोर बोलले.."

Latest Marathi News Live Update : भरधाव इन्होवा कार डिव्हायडरला धडकल्याने अपघात

Malaysia Job Portal: विदेशात नोकरीची सुवर्णसंधी! जॉब पोर्टल लाँच झाल्याने मलेशियात एजंटशिवाय मिळणार जॉब

Pashan News : पीएमपीच्या थांब्याअभावी प्रवाशांचे हाल; पाषाण-सूस रस्त्यावरील स्थिती; तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT