पुणे

विहिरीत क्रेनचे बकेट कोसळल्याने दोघांचा मृत्यू

CD

नसरापूर, ता. २९ : कोळवडी (ता. भोर) येथे ग्रामपंचायतीच्या विहिरीचे काम सुरू असताना क्रेनद्वारे बकेटमधून कामगार विहिरीत उतरत होते. यावेळी क्रेनचा वायररोप तुटला व क्रेनचे बकेट ५० फूट खोल विहिरीत कोसळले. यामुळे एका कामगाराचा जागीच तर दुसऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (ता. २९) दुपारी घडली.
अंकुश प्रभाकर गेडाम (वय २३, रा.येवली रामपुरी, ता.जि. गडचिरोली) व विजेंद्र रामानंद भारद्धाज (वय ४९, रा. उत्तरप्रदेश) ही मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. विहिरीचे खोदकाम करताना दुपारच्या जेवणाची सुट्टीनंतर पुन्हा काम सुरू करण्यासाठी क्रेनच्या बकेटमध्ये बसवून कामगारांना खाली सोडण्यात येत होते. काही कामगार खाली पोचल्यावर अंकुश व विजेंद्र हे दोघे बकेटमध्ये बसून खाली उतरत होते. यावेळी अचानक क्रेनची वायररोप तुटून बकेट पडले. वायर रोपचा लोखंडी हुक डोक्यात पडल्याने बकेटमधील अंकुश हे जागीच मृत पावले. दरम्यान, घटनास्थळी गावचे पोलिस पाटील अजित शिंदे, प्रमोद शिंदे व इतर कामगारांनी रुग्णवाहिका बोलून जखमींना नसरापूर येथील रुग्णालयात पोचविले. तेथे तर विजेंद्र याच्यावर उपचार सुरू असताना काही तासातच त्याचा मृत्यू झाला.
विहिरीत इतर काम करत असलेले कामगार गुरुदास डोमाजी भोयर, लहू दशरथ शिंदे, सुनील दिगंबर पवार, रंजना लहू शिंदे, रेश्मा सुनील पवार, वनीता तुकाराम शिंदे आदींना दुसऱ्या क्रेनच्या साह्याने सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

04132

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: एकाचा पत्ता सुलभ शौचालय, बसल्या बसल्या सही घेतली का? राज ठाकरेंचा आरोप; निवडणूक अधिकार्‍यांचे स्पष्टीकरण

मोठी बातमी! 21 नोव्हेंबरला DK शिवकुमार होणार कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री? सिद्धरामय्यांचं काय होणार? काँग्रेस सरकारवर मोठं संकट

Sikandar Shaikh Crime : पैलवान सिकंदर शेखच्या अटकेनंतर घरच्यांनी दिली प्रतिक्रिया म्हणाले...

Kabutarkhana: चार नवीन कबुतरखान्यांसाठी परवानगी, पण बाकीचे बंदच...; पालिकेचा मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची समझोता बैठक मुंबईत सुरु

SCROLL FOR NEXT