किरण भदे : सकाळ वृत्तसेवा
नसरापूर, (ता.भोर) येथील श्री महादेव बनेश्वराचे जलमंदिर, परिसरातील निसर्गनिर्मित वनउद्यान व उद्यानाजवळच वाहणारी शिवगंगा नदी त्यावरील धबधबा यामुळे भाविकांबरोबरच पर्यटकांची वर्षा विहारासाठी मंदिरास पसंती दिली जाते. श्रावणी सोमवारच्या पार्श्वभूमीवर बनेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे धार्मिक कार्यक्रमांसह भाविकांच्या सुरक्षितेसाठी विविध उपाययोजना केल्या आहेत.
शिवगंगा नदीतिरावर वनराईच्या निसर्गरम्य परिसरात श्रीमंत बाजीराव पेशवे यांनी जीर्णोद्धार केलेल्या या शिवमंदिरात पाणी प्रवाहाची विशिष्ट रचना करीत जलमंदिराचा अभास निर्माण केला आहे. बनेश्वराचे मंदिर आहे मंदिरात सोपा, सभामंडप व गर्भगृह असे तीन भाग आहेत. गाभाऱ्यात विष्णू व लक्ष्मी यांच्या मूर्ती आहेत. त्यांच्यासमोर उत्तराभिमुखी शिवलिंग आहे. शिवलिंगाखाली पाच छोटी शिवलिंगे असून, यात सतत पाणी वाहत असते.
मंदिराजवळील पर्यटनस्थळे
१. मंदिराबाहेर परिसरात साडे आठ हेक्टर क्षेत्रात नैसर्गिक बनेश्वर वनउद्यान
२. वनउद्यानात दुर्मीळ तसेच औषधी वृक्ष, सर्व प्रकारची फुलझाडे
३. मुलांसाठी खेळणी मोठ्यांसाठी अँडव्हेंचर पार्क
४. शिवगंगा नदीवर नयनरम्य धबधबा
५. केतकावळे येथे प्रतिबालाजी मंदिर व तेथून पुढे नारायणपूर दत्त मंदिर
धार्मिक विधी तसेच सामाजिक उपक्रम
१. बनेश्वर मंदिरात दररोज पहाटे अभिषेकासहीत महापूजा, महाआरती
२. शिवलिंगाला सजावट करून दिवसभर मंदिर परिसरात भजन,
३ सायंकाळी अग्निहोत्र तसेच रुद्र हवन
४. सामाजिक संस्थांच्या सहकार्याने नेत्रशिबिर,आरोग्य शिबिर
५. मंदिर परिसरातील वनहद्दीत प्रशस्त मोफत वाहनतळ
भाविकांच्या सुरक्षेसाठी
१. ट्रस्टतर्फे मंदिरपरिसरात सीसीटिव्हीची नजर
२. दर्शनबारीसाठी पोलिस, होमगार्डची व्यवस्था
३. सामाजिक संस्थाच्या मदतीने गर्दीचे नियंत्रण
अशी घ्या काळजी
१. मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवाव्यात
२. वनउद्यानात फिरताना नियमांचे पालन आवश्यक,
३. नदीत न उतरता लांबूनच धबधबा पाहण्याचा आनंद घ्यावा
मदतीसाठी संपर्क
राजगड पोलिस ठाणे : ८३२९१०२०३०
रुग्णवाहिका : १०८
श्रावण महिन्यात बनेश्वर महादेव मंदिरात विविध धार्मिक कार्यकमांचे आयोजन केले जाते. गर्दीच्या पार्श्वभूमीवर मंदिर व परिसर स्वच्छता, दर्शनबारी, या बरोबरच कोणतीही गैरसोय होऊ नये,दुर्घटना होऊ नये म्हणून देवस्थान ट्रस्टच्या वतीने योग्यती काळजी घेतली जाते.
- अनिल गयावळ, सचिव, बनेश्वर देवस्थान ट्रस्टचे
बनेश्वर मंदिरातातील श्रावण महिन्यातील गर्दीच्या पार्श्वभूमीवर पोलिस बंदोबस्त ठेवला जातो. सोमवार गर्दीच्या दिवशी बंदोबस्तात वाढ करून भाविकांना सुरक्षा पुरवली जाते.
- राजेश गवळी, पोलिस निरीक्षक, राजगड पोलिस ठाणे
05608
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.