नसरापूर, ता. ८ : घराच्या बांधकामासाठी आणलेली क्रश सॅण्ड डंपर ट्रॉलीमधून घराच्या समोर खाली करत असताना हायड्रॉलिकने उचललेल्या ट्रॉलीचा तोल जाऊन ट्रॉली डंपरसह पत्र्याच्या घरावर कोसळून घरामधील तीन मुलांसह त्यांची आई क्रश सॅण्ड खाली गाडले गेले. या दुर्घटनेत आईसह दोन मुलांना वाचविण्यात यश आले; मात्र एक पाच वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. राजगड पोलिस ठाण्यात डंपरचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आलोक अशोक कचरे (वय ५) असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. तर त्याची आई आरती अशोक कचरे (वय ३५), प्रियांका जगन्नाथ कचरे (वय १७), श्लोक अशोक कचरे (वय ६) असे जखमी झालेल्यांची नावे आहेत. तर अमरजीत राजभर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलाचे चुलते धोंडिबा कचरे यांनी फिर्याद दिली आहे. धनगर वस्तीवरील धोंडिबा रामभाऊ कचरे यांच्या घराच्या कामासाठी क्रश सॅण्ड (कच) डंपर (क्र. एमएच १२ केपी २११८) मधून मागवण्यात आली होती. ती खाली करण्यासाठी डंपरची ट्रॉली हायड्रॉलिक पंपाद्वारे उचललेली असताना या ट्रॉलीची तोल जाऊन शेजारील घरावर कोसळली. यामध्ये घरात असलेली आलोकसह आई व दोन मुले या सॅण्ड खाली दबले गेले. तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी तातडीने सॅण्ड बाजूला करण्यासाठी प्रयत्न केले. यामध्ये दोन मुलांसह आईला वाचविण्यात यश आले; मात्र पाच वर्षांच्या आलोकचा मृत्यू झाला. राजगड पोलिस पुढील तपास करत आहेत.
05955
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.