पुणे

देगाव येथे शोकसभा

CD

नसरापूर, ता. ३ ः दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला आहे. जनतेसाठी अहोरात्र झटणारा, प्रशासनासह कार्यकर्त्यांवर देखील मजबूत पकड असलेला अजितदादा पुन्हा होणे नाही, अशा शब्दात देगाव (ता. भोर) येथे अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
देगाव ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या वतीने येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर सभागृहात शोकसभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी आबासाहेब यादव, अशोक शेलार, सरपंच ॲड. संभाजी यादव, राजेंद्र सावंत, तुळशीराम सावंत, प्रशांत यादव, प्रकाश सावंत, आदिनाथ जगताप, गोपाळ यादव, विठ्ठल जाधव, नीलेश कोंढाळकर यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
शोकसभेत अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी बोलताना आबासाहेब यादव म्हणाले की, ‘‘लाख मरावे परंतु, लाखाचा पोशिंदा मरू नये, अशी आपल्याकडे म्हण आहे. ती अजितदादा यांना तंतोतंत लागू पडते. राजकीय, सामाजिक तसेच, विविध संस्थांवर काम करताना अजितदादा यांनी सर्वसामान्यांना प्राधान्य दिले. परखड, निर्भीड व चुकीला चुक व बरोबरला बरोबर म्हणण्याची त्यांच्यात हिंम्मत होती. असा हा लाखाचा पोशिंदा जाण्याने महाराष्ट्राचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे.’’
06164

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Road Accidents Reduction : २०३० पर्यंत रस्ते अपघात ५० टक्क्यांनी कमी होणार? ; राज्यसभेत गडकरींनी दिली महत्त्वपूर्ण माहिती

Pune Mumbai Expressway Traffic : द्रुतगती मार्गावरील अपघाताचा फटका; पुणे-बंगळूर महामार्गावर अवजड वाहतूक ठप्प

T20 World Cup: इशान किशनच ओपनर! सूर्याचा विश्वास पठ्ठ्याने सार्थ ठरवला, 7 Six अन् फिफ्टी; संजूचे स्थान धोक्यात

Pune Crime : मैत्रिणीला फोन केल्याच्या वादातून तरुणावर कोयत्याने हल्ला

Jan Arogya Yojana : राज्‍यातील उपकेंद्र, प्राथमिक आरोग्‍य केंद्रातही महात्‍मा फुले योजना; आता बाह्यरुग्ण विभागातील उपचारही मिळतील मोफत

SCROLL FOR NEXT