नसरापूर, ता. ६ ः जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांसाठी शनिवारी (ता. 7) होत असलेल्या निवडणुकीत सर्व नागरिकांनी मतदानाचा आपला हक्क बजावून सक्षम लोकप्रतिनिधी निवडण्याचे आवाहन विविध सामाजिक संस्था, व्यक्ती व प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
नागरिकांनी मतदानात शंभर टक्के सहभाग घ्यावा यासाठी प्रशासनाकडून मतदान जनजागृतीबाबत विविध कार्यक्रम घेण्यात आले. तर अनेक शाळांच्या विद्यार्थ्यांनी रॅली काढून मतदान जागृती केली.
सामाजिक बांधिलकी संस्थेचे अध्यक्ष गणेश चाळेकर म्हणाले, ‘‘रस्त्यावरील खड्डे, बेरोजगारी, शिक्षणाचा दर्जा, भ्रष्टाचार यावर बोलणारे अनेकजण मतदानाच्या दिवशी मात्र घरी बसतात. त्यांची हीच उदासीनता चुकीचे नेतृत्व जन्माला घालते त्याची किंमत संपूर्ण समाजाला मोजावी लागते. यासाठी सर्वांनी मतदानात सहभाग घेऊन विकासाची दृष्टी असणारे प्रतिनिधी निवडावे.’’
भोर येथील स्वामी समर्थ सेवा केंद्राचे संतोष कदम म्हणाले, ‘‘मतदान करताना भावनिक, जातीय, धार्मिक व आर्थिक प्रलोभनांना बळी न पडता केवळ विकास, पारदर्शकता आणि भविष्यातील संधी याचा विचार होणे गरजेचे आहे. तरुणांच्या हाताला काम देणारे, जनतेच्या प्रश्नांना सामोरे जाणारे असे जबाबदार नेतृत्व घडवणे आपल्या हातात आहे. त्यासाठी मतदानाला बाहेर पडा.’’
शंकरराव भेलके महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ तुषार शितोळे म्हणाले, लोकशाहीत वयाची १८ वर्ष पूर्ण होताच मिळणारा मतदानाचा अधिकारी ही केवळ सोय नसून आपल्या भागाचे, तालुक्याचे, जिल्ह्याचे, राज्याचे व देशाचे भविष्य घडवण्यासाठीची ताकद आहे. त्याचा वापर सर्व नवमतदारांनी अवश्य करुन सक्षम लोकप्रतिनिधी निवडावेत.’’
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे पुणे जिल्हा दक्षिण विभाग अध्यक्ष कवी रमेश रेडेकर म्हणाले, ‘‘मतदान जागृतीसाठी अनेक कविता केल्या आहेत. शिवाय ते उपस्थित राहत असलेल्या सर्व लग्नसमारंभात लोकशाहीच्या या उत्सवाची मंगलाष्टकाच सादर करतात. त्यातील शेवटच्या दोन ओळी.....आज लोकशाहीतला पवित्र दिन, हक्क बजावून देश करा महान, मतदान करा सर्वजण शुभमंगल सावधान.. शुभमंगलसावधान.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.