पुणे

घोड धरणातील उपयुक्त पाणीसाठा संपुष्टात

CD

न्हावरे, ता. १ : शिरूर-श्रीगोंदा तालुक्यातील सुमारे वीस हजार हेक्टर क्षेत्राला लाभदायक ठरणाऱ्या तसेच पिण्याच्या पाण्याची तहान भागविणाऱ्या चिंचणी (ता. शिरूर)
येथील घोड धरणातील उपयुक्त पाणीसाठा नुकताच संपुष्टात आला आहे. त्यामुळे येत्या आठ-दहा दिवसांत पाऊस पडला नाही तर अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजनांना लवकरच झळ बसण्याची शक्यता आहे.

रांजणगाव गणपती पंचतारांकित औद्योगिक वसाहतीच्या पाणीपुरवठ्यात आत्तापासूनच कपात करावी, अशी मागणी लाभक्षेत्रातील गावामधून होत आहे. धरणाची पाणी साठवण्याची क्षमता सात हजार ६३९ दशलक्ष घनफूट एवढी आहे. धरणातील पाण्यावर श्रीगोंदा, शिरूर, कर्जत तालुक्यातील सुमारे वीस हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते. त्याचबरोबर रांजणगाव गणपती येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहत, रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याला यामधून पाणी पुरवठा होतो. याबरोबरच शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती, न्हावरे, ढोकसांगवी, तरडोबाचीवाडी, गोलेगाव, करडे, निमोणे, शिंदोडी तसेच श्रीगोंदा तालुक्यातील हिंगणी, म्हसे, वडगाव शिंदोडी, काष्टी, श्रीगोंदा शहर आदी गावातील नागरिकांना या धरणाच्या जलाशयातून पाणी पुरवले जाते. गतवर्षी धरणक्षेत्रात पर्जन्यमान कमी झाले होते. त्यामुळे जलाशयात ऑगस्ट महिन्यात पन्नास टक्केही पाणी आले नव्हते.


घोड धरणाच्या जलाशयातील ३० मे रोजी उपयुक्त पाणीसाठा संपुष्टात आला आहे. जलाशयात एक हजार ८३ दशलक्ष घनफुट (एम.सी.एफ.टी) मृत पाणीसाठा शिल्लक आहे.
-मारूती ठणके, अभियंता, घोड धरण
02020

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संगमनेरकरांना मोठा दिलासा! आमदार खताळ यांच्यामुळे भूखंड आरक्षणावर निघाला तोडगा

Pune Traffic Issue : वाहतूक अडथळ्यांच्या कारणांचा अहवाल सादर करा; आयुक्तांचा आदेश

Sachin Yadav: नीरजलाही मागे टाकणारा कोण आहे सचिन यादव? पोलिस भरतीनंतर भालाफेक सोडण्याचा केलेला विचार, पण...

Mamata Banerjee: ८४० कैदी तुरुंगातून मुक्त! विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांचा निर्णय, नेमकं कारण काय?

Latest Maharashtra News Updates : प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची छेडखानी, तक्रार करुनही कारवाई नाही

SCROLL FOR NEXT