पुणे

‘ओंकार शुगर’च्या बोत्रे पाटील यांना पुरस्कार

CD

न्हावरे, ता. २५ : साखर उद्योगाच्या प्रगतीसाठी दिलेले योगदान आणि तंत्रज्ञानाच्या विकासासाठी केलेले प्रयत्न याबद्दल उत्कृष्ट साखर उद्योजक गौरव पुरस्कार ओंकार शुगर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष बाबूराव बोत्रे पाटील यांना कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते देण्यात आला.

पुणे येथे नुकताच ओंकार शुगर ग्रुपचे संचालक ओमराजे बोत्रे पाटील यांनी सन्मान स्वीकारला. सागर उद्योग क्षेत्रातील आघाडीची संस्था दि डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशन (इंडिया) आयोजित ७० वी वार्षिक परिषद आणि शुगर एक्स्पो २०२५ जे. डब्ल्यू. मॅरिऑट हॉटेल येथे उत्साहात झाली. त्यामध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पुरस्कार वितरण सोहळ्यास महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, राष्ट्रीय साखर संस्थेच्या संचालक डॉ. सीमा परोहा, साखर आयुक्त सिद्धाराम सालीमठ, वेस्ट इंडिया शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, श्री. संजय अवस्थी तसेच एन. चिन्नप्पन यांची प्रमुख उपस्थित होते.
साखर उद्योगाच्या प्रगतीसाठी दिलेले योगदान आणि तंत्रज्ञानाच्या विकासासाठी केलेले प्रयत्न याची दखल घेत हा सन्मान ओंकार ग्रुपला मिळाल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन केले.

02380

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उच्च शिक्षण आयोगाला नवीन अधिकार मिळणार! महाराष्ट्र विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयक सादर; हे नेमके काय आहे अन् तरतुदी कोणत्या?

VIDEO : 'देव कोणत्या रूपात भेटेल, सांगता येत नाही…'; मंदिराबाहेर बसलेला कुत्रा देतोय 'आशीर्वाद', पाहा मनाला भिडणारा व्हिडिओ

Lyari Town Real Story : कामगारांची घरं कशी बनली माफियांचा अड्डा? 'धुरंदर' चित्रपटातल्या 'Lyari Town'ची खरी गोष्ट...

IND vs SL: भारतीय संघात बदल... २ अनकॅप्ड खेळाडूंची झाली निवड; ५ सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेत आता येणार चुरस

Arabic Song: अरबी म्युझिकचा नाव स्वॅग! ‘FA9LA’ अन् ‘कहो ना कहो’ सारखी बॉलिवूडमधील गाणी एकदा ऐकाच

SCROLL FOR NEXT