प्रताप भोईटे
न्हावरे : नोकरी नाही तर सेवा या भावनेने वैद्यकीय अधिकारी व बहुतांशी कर्मचारी एक जिवाने काम करीत असल्यामुळे न्हावरे (ता. शिरूर) येथील ग्रामीण रुग्णालयात दररोज सुमारे २०० पेक्षा अधिक रुग्ण ओपीडीच्या (प्राथमिक आरोग्य तपासणी व उपचार) माध्यमातून वैद्यकीय सुविधेचा लाभ घेतात. तर येथील दर रविवारच्या आठवडे बाजारच्या दिवशी ओपीडीच्या माध्यमातून २५० पेक्षा अधिक रुग्ण वैद्यकीय सुविधेचा लाभ घेतात. येथील ग्रामीण रुग्णालयात परिसरातून येणाऱ्या रुग्णांची संख्या नेहमीपेक्षा जवळपास दुप्पट असते. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी वेळेवर उपस्थित असतात त्यामुळे कर्मचारीही उपस्थित असतात.
येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक म्हणून सचिन डफळ म्हणून काम करतात त्यांना स्त्री रोग तज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी दिनकर सरोदे, बाल रोग तज्ज्ञ वैशाली पवार, डॉ. राम शिंगाडे म्हणून त्यांना मोलाची साथ देऊन जबाबदारी सांभाळतात. येथे ओपीडी, अॅडमिट ओपीडी, आयपीडी, एक्सरे, ईसीजी, लहान मुलांसह गर्भवती महिलांचे लसीकरण, प्रसूती सेवा, शस्त्रक्रिया कक्ष (ऑपरेशन थिएटर) त्याचबरोबर सर्पदंश, विंचूदंश त्याचबरोबर विष प्राशनकेलेल्या रुग्णावर प्राथमिक उपचार आदी सर्व प्रकारच्या सेवा उपलब्ध आहेत न्हावरे गाव तालुक्याच्या पूर्व भागातील बाजारपेठेचे मोठे गाव असल्याने व सेवा सहज मिळत असल्यामुळे दररोज ओपीडीच्या माध्यमातून अनेक रुग्ण मोफत वैद्यकीय तपासणी व औषधोपचार यासारख्या वैद्यकीय सुविधांचा लाभ घेत असतात. येथील
ग्रामीण रुग्णालयात एक स्वच्छता कर्मचारी व तंत्रस्नेही अशा दोन कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा आहेत याबाबत जिल्हास्तरावर प्रस्ताव पाठवला आहे. तपासणीसाठी रुग्णांना जास्त वेळ ताटकळत बसण्याची वेळ शक्यतो येत नाही. मध्यंतरीच्या काळात खोकल्याच्या पातळ औषधाच्या (कफ सिरप) बाटल्यांचा काही प्रमाणात तुटवडा जाणवत होता, मात्र सध्या सर्व प्रकारची औषधे पुरेशा प्रमाणात उपलब्ध
- डॉ. दिनकर सरोदे, वैद्यकीय अधिकारी तथा स्त्री रोग तज्ज्ञ, न्हावरे
बेशिस्त वाहनांमुळे...
रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांकडून ग्रामीण रुग्णालयात आल्यानंतर आपली दुचाकी बेशिस्तपणाने रुग्णालयासमोर लावत असल्यामुळे रुग्णवाहीका काढण्यास अडचण होते याबाबत शिस्तीचे पालन व्हावे ही अपेक्षा कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.
2415